Headlines

ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!:सुखशांती वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ‘हनुमान अंश’ चित्रपटाची ‘रोटरी’कडून मेजवानी‎



ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अमरावती, अंबानगरीच्यावतीने सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. शहरातील सुखशांती वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एक दिवसाचा विरंगुळा’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच

.

चित्रपटाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर ज्येष्ठांनी रोटरी सदस्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. हसत-खेळत आणि संवाद साधत त्यांनी काही काळ दैनंदिन चिंतांपासून दूर राहून आनंदाचे क्षण अनुभवले.

सहभागी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चित्रपटाच्या तिकिटांचा खर्च सेवाभावी सहकाऱ्यांनी उचलला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्पोपहाराचीही विशेष व्यवस्था तापडीया सिटी सेंटरच्यावतीने करण्यात आली. या सेवा कार्यासाठी आशीष पेठे आणि विवेक यादव यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. तसेच सुखशांती वृद्धाश्रमाच्या संस्थापिका सुनम रेखाते यांनी उपक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.

या सेवा प्रकल्पाचे नेतृत्व प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर नंदकिशोर राठी यांनी केले, तर प्रीतम अळमळ यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उपक्रमात रोटरी परिवारातील हेमंत चांडक, प्रशांत करवा, सचिन रौंदळकर, बजरंग चांडक आणि रश्मी वाकोडे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबानगरीचे अध्यक्ष विक्रांत जोशी, सचिव अतुल अनासने आणि सचिव आशीष वाकोडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवत रोटरी सदस्यांनी संवाद साधला, हास्य-विनोद केले आणि आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत वाटून घेतले. “ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर उमटलेले एक हास्य हीच आमच्या सेवेची खरी पावती आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *