Headlines

डोंबिवलीत ‘जेन झी’ जपतेय भजन परंपरा:टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम




लोकमान्य टिळकांनी मांडलेला ‘सामाजिक एकोपा आणि संस्कृती संवर्धनाचा’ मूळ विचार तितक्याच निष्ठेने जपणारे एक मंडळ डोंबिवलीत अभिमानाने उभे आहे. जेन झी मोबाइल, रील्स आणि सोशल मीडियाच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे, परंतु डोंबिवलीतील ‘टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने’ यावर एक अनोखा आणि मार्गदर्शक तोडगा शोधून काढला आहे. तरुणाईला स्क्रीनपासून दूर ठेवून, पारंपरिक भजने आणि संस्कृतीच्या रंगात रंगवून घेण्याचे काम हे मंडळ गेली ७६ वर्षे अत्यंत यशस्वीरीत्या करत आहे. रील्स नव्हे, लेझीम आणि पारंपरिक कलांना प्राधान्य व्हिडिओ बनवण्याऐवजी येथील ५० ते ६० महिला व तरुण-तरुणी गेल्या २०-२२ वर्षांपासून गणेशोत्सवापूर्वी दोन महिने लेझीमचा सराव करतात. विसर्जन मिरवणुकीत हेच लेझीम पथक, झांज, ढोल-ताशा आणि मानवी मनोरे साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेते. इतकेच नव्हे तर आगमन मिरवणुकीत आदिवासी तारपा नृत्य, लाठीकाठी आणि ढोल नृत्यासारख्या लोप पावत चाललेल्या पारंपरिक कलाप्रकारांना सादर केले जाते. मोबाइल बाजूला ठेवून रात्रभर भजनाचा गजर उत्सव काळात तरुणाईला सोशल मीडियापासून काही काळ लांब ठेवण्यासाठी मंडळातर्फे ‘भजन रात्रीं’चे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे यात ५ वर्षांच्या लहानग्यांपासून ते ७० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वजण एकत्र येतात. तरुणाई स्वतः ही भजने म्हणते आणि संपूर्ण नगर भक्तिरसात न्हाऊन निघते. यादरम्यान महिला कार्यकर्ते घटनास्थळीच ‘दडपे पोहे’ बनवून सर्वांना खाऊ घालतात, ज्यामुळे एकतेची आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *