![]()
शहरात गेल्या ६४ वर्षांपासून अंबा गेटच्या आतील पटवीपुरा येथील श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाने आरोग्य सेवेचे व्रत सांभाळले आहे. दरवर्षी न चुकता या मंडळाने मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याची परंपरा कायम राखली आहे. यासोबतच ५०० वृक्षांची लागवड क
.
पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी वृंदावन येथील निधीवनाचा देखावा उभारण्यात येणार आहे. त्यात आकर्षक कारंजे हे भाविकांचे मुख्य आकर्षण राहणार आहे. गणरायांची मूर्ती मातीपासून तयार करण्यात आली आहे. संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक आहे. त्यामुळेच मंडळाला सलग दोन वर्षे २०२४ व २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाचा पुरस्कार मिळाला आहे. महानगरपालिकेद्वारे आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला दरवर्षी पुरस्कार मिळाला आहे. पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेतही मंडळाला दरवर्षी आदर्श गणेशोत्सव मंडळ पुरस्कार मिळत आला आहे.
मागील काही वर्षांत सर्वसामान्यांना उपयोगी पडेल अशी आरोग्य शिबिरे घेण्यासोबत हुबेहुब देखावे साकारण्यात श्री बजरंग मंडळाचा हातखंडा राहिला आहे. त्यामुळे येथील श्री गणेशाच्या दर्शनासह देशातील धार्मिक स्थळांचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. शहरातील पर्यावरणपूरक गणेश मंडळ अशीही या मंडळाची ख्याती आहे. येथील सजावट पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, अशा प्रकारे केली जाते. मंडळाकडून पर्यावरण रक्षणाचा संदेश सातत्याने दिला जात आहे.
मंडळाची कार्यकारिणी अध्यक्ष बाबुलाल मामर्डे, सचिव अॅड. शेखर मामर्डे, गणेशोत्सव कार्यकारिणी : अध्यक्ष डॉ. राजेश जवादे, कार्याध्यक्ष जगदीश गुप्ता, संयोजक गजानन परिहार, स्वागताध्यक्ष प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष विजय टोंगसे, राजकुमार मामर्डे, तेजपाल कुमावत, सचिव आयुष पवार, सहसचिव मकवाने आदी.