Headlines

वानवडीत गणपती विसर्जनाला गेलेल्या कुटुंबाच्या घरात आग:देवघराशेजारील टेबल आणि पाटा जळाला, अग्निशमन दलाने आग विझवली; जीवितहानी टळली




गणेशोत्सवाच्या काळात देशपातळीवर व राज्यात उत्साह आणि भक्तिमय वातावरण असते. बाप्पाच्या आगमनानंतर घर व अनेक मंडळे दहा दिवस बाप्पांची सेवा करीत असतात. यावेळी घरात अथवा मंदिरात दिवा, उदबत्ती, विद्युत रोषणाई आणि मोठ्या प्रमाणात सजावट केलेली असते. हा उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी अग्निशमन विभाग सतर्क राहून आपले कर्तव्य चोख बजावत असताना नागरिकांनी देखील खबरदारी घेणे आवश्यक आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वानवडी येथील एका इमारतीत सातव्या मजल्यावर आग लागल्याची वर्दि मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. जवानांनी धाव घेत पाहणी केली असता घरातील देवघराशेजारी असलेले टेबल व त्यावरील पाटाने पेट घेतला होता. कुटूंबातील सर्व सदस्य श्रींच्या दिड दिवसाचे विसर्जनाकरिता गेले असता हि घटना घडली. देवघराला ही याची झळ बसली असून जवानांनी लगेचच आगीवर पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली व धोका दूर केला. या घटनेत जखमी कोणी नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे व वाहन चालक दिपक कचरे आणि फायरमन मोहन सणस, सागर नेवगे, पृथ्वीराज खेडेकर, शिवकुमार दिक्षित यांनी सहभाग घेतला. कोट “गणेशोत्सवाच्या काळात दलाचे जवान सज्ज असून भाविकांनी मंडप व घरामध्ये पेटता दिवा त्याची वात तसेच उदबत्ती याची विशेष खबरदारी घेत विद्युत यंञणा ही सुस्थितीत राहिल हे पाहावे. आग वा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधावा.” गणेश सोनुने, मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग, पुणे मनपा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *