![]()
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचा बुधवारी (१६ सप्टंेबर ) श्रीगोंदे तालुक्यात मुक्काम होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन श्रीगोंदे शहर व तालुक्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जरांगे पाटील बुधवारी रात्री श्रीगोंदे शहरातील बाजार तळ परिसरात दाखल होणार असून तेथे त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना भेटण्यासाठी व विचार ऐकण्यासाठी अहिल्यानगर, पुणे, बीड व धाराशिव जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. बंदोबस्तात पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस निरीक्षकांसह ५० अधिकारी, ३५० पोलिस कर्मचारी, एसआरपीएफची एक तुकडी आणि दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी मंगळवारी सायंकाळी श्रीगोंद्यात भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली व दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचना दिल्या. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी श्रीगोंद्यात येऊन तयारीचा आढावा घेतला होता. बाजार तळ परिसरात मराठा बांधवांकडून स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा समाजाकडून सुरू असलेली तयारी पाहता श्रीगोंद्यात आज राजकीय-सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे. प्रशासनासाठी गर्दीचा उत्साह कायम ठेवत कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हीच खरी कसोटी असेल. जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जामखेडचे चौक सजले, कमानी उभ्या / वृत्त पान ४. चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था . पारगाव रोड : पारगाव, अहिल्यानगरकडून येणारी वाहने . आढळगाव रोड : आढळगाव, जामखेडकडून येणारी वाहने .घोडेगाव रोड : घोडेगाव, राशीनकडून येणारी वाहने . काष्टी रोड : काष्टी, दौंडकडून येणारी वाहने या ठिकाणी वाहने पार्क केल्यानंतर नागरिकांना पायी बाजार तळावर जाता येणार आहे. मुख्य रस्त्यांवर वाहने उभी करू नये जरांगे पाटील यांच्या मुक्कामामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने मुख्य रस्त्यांवर वाहने उभी करू नयेत. प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने लावून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
जरांगे पाटील यांचा आज श्रीगोंद्यामध्ये मुक्काम; 400 पोलिसांचा बंदोबस्त, बाजार तळावर मुक्काम; एसआरपीएफ व दंगल नियंत्रण पथकासह प्रशासन सज्ज