Headlines

शेतकी खरेदी-विक्री संघाला पुनश्च ऊर्जितावस्था आणणार- हिंगणकर:व्यापारी संकुलाच्या माध्यमातून नवे आर्थिक स्रोत उभारण्याचा मानस‎




तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संघाला १०० हून अधिक वर्षांची उज्ज्वल, समृद्ध परंपरा लाभली आहे. दूरदृष्टी असणाऱ्या तत्कालीन समाजधुरिणांनी उभारलेल्या या वैभवशाली संस्थेला पुनश्च ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ पूर्ण ताकदीने कटिबद्ध आहे. संस्थेच्या उत्पन्नाचे नवे, भक्कम स्रोत निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. अशी ठाम ग्वाही ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर यांनी दिली. अकोट शेतकी खरेदी-विक्री संघाच्या १०३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांशी संवाद साधताना ते बोलत होते. संस्थेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावर भव्य व्यापारी संकुल उभारून नवीन आर्थिक स्रोत निर्माण करण्याचा विचार संचालक मंडळ करत असल्याचे त्यांनी सांगितले. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे दिवंगत अध्यक्ष हिदायतउल्ला खाँ पटेल, माजी उपाध्यक्ष मनोहरराव गये, संचालक विनायकराव इंदोरे व मनोहरराव सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर व्यवस्थापक डी. एस. हिंगणकर यांनी सभेपुढे संस्थेचा वार्षिक अहवाल, आर्थिक पत्रके, ताळेबंद, अंदाजपत्रक, नफा-तोटा पत्रक सादर केले. सर्व भागधारकांनी टाळ्यांच्या गजरात या सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. आमसभेत डॉ. गजाननराव महाले, प्रशांत पाचडे, डॉ. प्रमोद चोरे व अतुल खोटरे या सभासदांनी मांडलेल्या विधायक सूचनांचे स्वागत करण्यात आले. त्यावर सकारात्मक अंमलबजावणीचे आश्वासन नानासाहेब हिंगणकर यांनी दिले. या सभेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धीरज हिंगणकर, उपसभापती विजयराव रहाणे, माजी सभापती शंकरराव चौधरी, प्रशांत पाचडे, माजी उपसभापती अतुल खोटरे, गजाननराव गावंडे, गजानन सोनोने, रमेश खलोकर, जिनिंग फॅक्टरीचे उपाध्यक्ष रामदास थारकर, जिल्हा बँकेचे संचालक जावेद पटेल यांच्यासह संचालक सुभाषराव मगर, दयाराम पाटील धुमाळे, संतोष पुंडकर, हरिभाऊ मानकर, सुरेंद्र ठाकरे, माधवराव बकाल, कुलदीप भिसे, अलोक रहाणे, श्रीकृष्ण रोठे, त्र्यंबकराव मंगळे, दीपक पवार, अरुण जवंजाळ, विजेंद्र तायडे, वृषाली ओळंबे, सविता पाटकर, देविदास बुले, दीपक बुंदे, सारंगधर वालसिंगे आदी विविध संस्थांचे पदाधिकारी, भागधारक उपस्थित होते. तळोकार यांनी आभार मानले. सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात सहकारी तत्त्वावर खते, बि-बियाणे आणि कीटकनाशकांचा व्यवसाय चालवणे अत्यंत आव्हानात्मक झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोट शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावर भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा विचार संचालक मंडळ करत आहे. या माध्यमातून संस्थेसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक भक्कम आणि शाश्वत आर्थिक स्रोत निर्माण केला जाईल, अशी माहिती ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *