मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पाटोद्यात सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर आपले उपोषण 90 दिवसांसाठी स्थगित केले. या निर्णयावर ओबीसी आंदोलक आणि नेते लक्ष्मण हाके यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत
.
मी बॉण्ड पेपरवर लिहून दिले होते की हा मुंबईला जाणार नाही
जरांगे यांच्या उपोषण स्थगितीच्या घोषणेनंतर माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले. “मनोज जरांगे यांच्या मागण्या मुळातच बेकायदेशीर आणि संविधानाला छेद देणाऱ्या होत्या. त्यांची अर्वाच्य भाषा, नेत्यांवर केलेली शिवीगाळ आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्याविरोधात घेतलेली ठाम भूमिका यामुळे जरांगे मुंबईला जाणे शक्यच नव्हते.”
“कालच मी सांगलीतील पत्रकार परिषदेत बॉण्ड पेपरवर लिहून देण्याची भाषा केली होती की हा माणूस मुंबईला जाणार नाही. आज तो म्हणतोय मुंबईत आधीच १ लाख लोक पोहोचले होते. मग हे 1 लाख लोक नेमके कुठे होते? अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर, आझाद मैदानावर की शिवतीर्थावर? 40 लाख वाहने आणि लाखांच्या आकड्यांची निव्वळ आवई उठवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम जरांगेंनी केले आहे.”
मराठा पुढाऱ्यांनी खतपाणी घातले, आता किंमत मोजावी लागेल
राज्यातील मराठा नेत्यांवर थेट प्रहार करताना हाके म्हणाले, गेल्या दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्रातील अनेक मराठा पुढाऱ्यांनी केवळ स्वतःच्या राजकीय समीकरणांसाठी या आंदोलनाला बळ पुरवले. या अवाजवी पाठिंब्यामुळे जरांगेचे धैर्य इतके वाढले की तो राज्यातील सर्वोच्च पदावरील मंत्र्यांनाही घाणेरड्या शब्दांत बोलू लागला आणि राज्यात सामाजिक तेढ निर्माण केली.
“ज्या ज्या मराठा पुढाऱ्यांनी जरांगेच्या घटनाबाह्य मागण्यांना आणि भूमिकेला मूक किंवा उघड पाठिंबा दिला आहे, ते संपूर्ण ओबीसी समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाज अशा नेत्यांना मत न देता खड्यासारखे बाजूला काढेल, हे मी आजच लिहून देतो.”
ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकला
ओबीसी प्रवर्गात सुरू असलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपावर तीव्र आक्षेप घेत हाके यांनी सरकारवरही ताशेरे ओढले. सरकारच्या दबावापोटी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील धनदांडगे आणि जातदांडगे बोगस कुणबी प्रमाणपत्रे मिळवून ओबीसी प्रवर्गात बेकायदेशीरपणे घुसत आहेत. या घुसखोरीमुळे मूळ ओबीसींच्या हक्कांवर गदा आली असून, एमपीएससी (MPSC) आणि यूपीएससी (UPSC) सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मूळ ओबीसी तरुणांचे नुकसान होत आहे.
“शासनाने जरांगेच्या दबावाखाली येऊन ओबीसी आरक्षणाचा निव्वळ ‘जनरल वॉर्ड’ बनवला आहे. ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरून तोडफोड करत नाही याचा अर्थ त्याला काही कळत नाही, अशा भ्रमात राज्य सरकारने राहू नये,” असा सज्जड इशाराही हाके यांनी दिला.
—————-
हेही वाचा…
ना नवा GR, ना लेखी हमी; ओबीसींचे आरक्षण पूर्णपणे सुरक्षित!: जरांगेंच्या उपोषण स्थगितीनंतर बबनराव तायवाडेंचे मोठे वक्तव्य

मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चेनंतर आपले उपोषण ९० दिवसांसाठी स्थगित केले. या घडामोडींवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया नोंदवली आहे. “सरकारच्या शिष्टमंडळाची आणि जरांगे यांची झालेली चर्चा पाहता, ओबीसींच्या मूळ आरक्षणाला कुठेही नख लागलेले नाही. यंदा सरकारने कोणताही नवीन शासन निर्णय (GR) काढलेला नाही किंवा कोणतेही लेखी आश्वासन दिलेले नाही; त्यामुळे ओबीसींचे आरक्षण १०० टक्के अबाधित आहे,” असे स्पष्ट मत डॉ. तायवाडे यांनी व्यक्त केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
19 दिवसांनंतर आंदोलन स्थगित होताच अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप: म्हणाले- उपोषण सोडण्यासाठी जरांगे सरकारच्या हातापाया पडत होते; ईडीच्या धाकावरून निशाणा

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 19 दिवसांनंतर आपले उपोषण 90 दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आज (17 सप्टेंबर) पहाटे सरकारी शिष्टमंडळासोबत झालेल्या दीड तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. मात्र, उपोषण स्थगित झाल्याची बातमी येताच मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी