Headlines

संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात वीज कोसळून 5 ठार:दहिगावात शेतकरी दांपत्य; पिशोरला 3 महिलांचा मृत्यू, 4 जण जखमी




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज कोसळून गुरुवारी एकाच दिवसात ५ ठार झाले. त्यात दहिगाव (ता. सिल्लोड) येथील शेतकरी दांपत्य आणि पिशोर (ता. कन्नड) येथील ३ महिला मजुरांचा समावेश आहे. पावसात झाडाखाली व झोपडीत आश्रय घेतल्याने या दुर्घटना घडल्या. या दोन्ही घटनांत ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दहिगाव येथील शेतात मनोहर भिवसन दुधे, पत्नी व मुलासह गेले होते. दुपारी साडेबारा वाजता पावसामुळे त्यांनी झोपडीत आश्रय घेतला. झोपडीवर वीज कोसळून दुधे दांपत्य जागीच ठार झाले. दुसरी घटना पिशोरमध्ये दुपारी २ वाजता घडली. पावसामुळे झाडाखाली थांबलेल्या ३ शेतमजूर महिला वीज कोसळून ठार झाल्या.संबंधित. पान ७ मराठवाड्यासह राज्यभरात पुढील ५ दिवस पाऊस हवामान विभागाने १८ आणि १९ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर २० ते २२ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर २१ आणि २२ रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यावेळी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत विदर्भात काही ठिकाणी पाऊस शक्य आहे. विजेची पूर्वसूचना देणारे
दामिनी मोबाइल ॲप विजेच्या धोक्यापासून बचावासाठी दामिनी हे मोबाइल ॲप उपयुक्त आहे. युझरच्या जीपीएस लोकेशननुसार पुढील १५ ते ४० मिनिटांत परिसरात वीज पडण्याची शक्यता आहे का, याची सूचना ॲपवर मिळते. २० ते ४० किमीच्या परिघात कुठे वीज कडाडेल याचा इशाराही याद्वारे मिळतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *