![]()
माजलगाव धरणाची उंची अर्ध्या मीटरने वाढवल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होतील यासाठी प्रस्तावाला शेतकरी संघर्ष समितीने कडाडून विरोध केला. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी माजलगाव धरणात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा
.
धरणाच्या उंचीवाढीच्या निर्णयाला आमदार प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा असल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या मुद्द्यावरून आमदार प्रकाश सोळंके, ओमप्रकाश शेटे आणि शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय व सामाजिक संघर्षाची पार्श्वभूमी निर्माण झाली आहे. आंदोलनस्थळी महसूल प्रशासनाचा अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांचा तगडा बंदोबस्त; जलतरण पथकही दाखल : जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव शहर पोलिसांकडून धरण परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. जलतरण पथकही धरण परिसरात दाखल झाले होते. उंची वाढवण्याला शेतकऱ्यांचा विरोध माजलगाव धरणात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. हा गाळ काढल्यास धरणाची पाणी साठवण क्षमता वाढू शकते, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होण्याची शक्यता असलेली धरणाची उंची वाढवण्याची प्रक्रिया करण्याऐवजी प्रथम धरणातील गाळ काढावा, अशी मागणी करण्यात आली.