Headlines

लालबाग राजा’च्या चरणी 3 दिवसांत पावणेदोन कोटींची रोख दानपेटीत जमा:3 वर्षांत 32 किलो सोने अर्पण; दानाने ओलांडली 50 कोटींची वेस



मुंबईची शान आणि कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या “लालबागचा राजा’ चरणी यंदाही भाविकांनी भरभरून दान अर्पण करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या अवघ्या तीन दिवसांतच राजाच्या दानपेटीत १ कोटी ९० लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम जमा झाली आ

.

रोख रकमेसोबतच भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले सुमारे ६४७.४७ ग्रॅम सोने आणि तब्बल १२.३८ किलोहून अधिक चांदी दानपेटीत मोजण्यात आली आहे. लालबागच्या राजाचे दर्शन १४ सप्टेंबरपासून सुरू झाले असून भाविकांची पावले नवसाच्या आणि मुखदर्शनाच्या रांगेकडे अविरत वळत आहेत.

दर्शनाच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत (१५ ते १७ सप्टेंबर) दानपेटीत मोजल्या गेलेल्या दानाचा तपशील मंडळाकडून अधिकृतरीत्या समोर आला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत दानाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

यंदा ८० फुटांचे महाकाल प्रवेशद्वार आणि हरित ऊर्जा

यंदा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या प्रेरणेने ८० फूट उंच आणि ६० फूट रुंद भव्य प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे. या प्रवेशद्वारावर भगवान शंकराची ३५ फूट उंच मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश देत यंदा ११ दिवसांत उत्सवातून निर्माण होणाऱ्या ८० टन ओल्या कचऱ्यापासून तब्बल ७,७४४ युनिट वीजनिर्मिती केली जाणार आहे. आगामी दिवसांत दानाचा हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मागील तीन वर्षांतील देणगीचा धावता आलेख

  • वर्ष २०२३: सुमारे ५.६५ ते ६ कोटी रोख, ३.५ ते ४ किलो सोने आणि ६० ते ६४ किलो चांदी जमा झाली होती. लिलावासह एकूण मूल्य ₹ १२ ते ₹ १३ कोटींच्या घरात गेले होते.
  • वर्ष २०२४: अनंत अंबानी यांनी अर्पण केलेल्या २० किलो सोन्याच्या मुकुटासह (मूल्य १५ कोटी) एकूण ४.१५ किलोहून अधिक सोने, ६६ किलो चांदी आणि ₹ ५.६५ कोटी रोख जमा झाले होते. एकूण मूल्यांकन २२ ते २५ कोटींच्या पार पोहोचले होते.
  • वर्ष २०२५: १० दिवसांत ₹ ५.५ ते ₹ ६.२ कोटी रोख रकमेसह ३.८ किलो सोने आणि ६० ते ६५ किलो चांदी मंडळाच्या तिजोरीत जमा झाली.

३ दिवसांतील दानपेटी जमा तपशील

  • १५ सप्टेंबर (पहिला दिवस): स्टेज पेटीत २७ लाख ५० हजार रुपये आणि रांग पेटीत २१ लाख रुपये जमा झाले असून, पहिल्या दिवशी एकूण रोख रक्कम ४८ लाख ५० हजार रुपये, ६६.७७० ग्रॅम सोने आणि २,८०६.००० ग्रॅम चांदी जमा झाली.
  • १६ सप्टेंबर (दुसरा दिवस): स्टेज पेटीत ५९ लाख ६० हजार रुपये आणि रांग पेटीत २९ लाख ३० हजार रुपये जमा झाले असून, दुसऱ्या दिवशी एकूण रोख रक्कम ८८ लाख ९० हजार रुपये, २२६.१२० ग्रॅम सोने आणि ५,५१६.००० ग्रॅम चांदी जमा झाली.
  • १७ सप्टेंबर (तिसरा दिवस): स्टेज पेटीत ३१ लाख २० हजार रुपये आणि रांग पेटीत २१ लाख ८० हजार रुपये जमा झाले असून, तिसऱ्या दिवशी एकूण रोख रक्कम ५३ लाख रुपये, ३५४.५८० ग्रॅम सोने आणि ४,०६७.००० ग्रॅम चांदी जमा झाली.
  • तीन दिवसांतील एकूण जमा: तिन्ही दिवसांत स्टेज पेटीत एकूण १ कोटी १८ लाख ३० हजार रुपये आणि रांग पेटीत एकूण ७२ लाख १० हजार रुपये जमा झाले असून, एकूण रोख रक्कम १ कोटी ९० लाख ४० हजार रुपये, एकूण सोने ६४७.४७० ग्रॅम आणि एकूण चांदी १२,३८९.००० ग्रॅम जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *