Headlines

चांदवड शहरात सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश:सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत सोहळा‎




चांदवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात बाजार समिती संचालक वाल्मिक वानखेडे, माजी सरपंच राजेश वानखेडे, माजी सरपंच विलास गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य पप्पू अभंग, शामराव वानखेडे, शरद साळवे, संदीप साळवे, श्रीकांत वानखेडे, तेजस केदारे, दहेगावचे सरपंच गजानन पगारे, डॉ. सुनील सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा संघटनात्मक कामकाजासाठी उपयोग होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन शिवसेना सचिव चौधरी यांनी केले. नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळाले असून, आगामी काळात जनसंपर्क आणि संघटनविस्ताराचे काम अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे, तालुकाप्रमुख नीलेश ढगे, नगरसेवक सुधीर कबाडे, प्रभाकर ठाकरे, प्रशांत ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *