![]()
वाळूच्या व्यवसायात पार्टनर करतो म्हणून घेतलेले १० लाखरुपये परत मागितल्याने परळी येथील ३५ वर्षीय तरुणाचालातुरात खून करण्यात आला. ही घटना बुधवारी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास उस्मानपुरा भागातील एका हॉटेलसमोर घडली. या घटनेतील संशयित आधीच हॉटेलमधे जमले होते आणि बाहेर उभ्या केलेल्या कारमध्ये कोयता आणि सुरा त्यांनी लपवून ठेवला होता. खून केल्यानंतर मुख्य संशयित तथा राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचा परळीचा नगरसेवकअल्ताफ सरदारखाँ पठाण हा आपल्या दोन सहकाऱ्यांसह पसार झाला आहे.संशयितांनी परळीपासून पाळत ठेवत लातूरमध्ये हत्याकांड घडवले. मन्सूरअली शेख लायकअली शेख(३५, रा.परळी) असे या घटनेतील मृताचेनाव आहे. त्याने अल्ताफ पठाण याला १०लाख रुपये दिले होते. मन्सूरअलीने पैसेपरत मागितल्याने त्यांच्यात काहीदिवसांपासून वाद सुरू होते. मन्सूरअली मित्रांसोबतजेवणासाठी ते उस्मानपुरा येथील हॉटेलमध्ये जाणारअसल्याची माहिती मिळताच संशयित अल्ताफ पठाण,खालेद हमीद शेख आणि उमर मेहबूब शेख यांनी रात्री १०.३०वाजता मन्सूरसोबत भांडण उकरुन काढत त्याचा खून केला. एकाने गळा चिरला तर दुसऱ्याने छातीत, पोटात सुऱ्याने केले वार मृत मन्सूरअली शेख याचा खून करण्याचापूर्वनियोजित कट रचल्याचे समोर आले आहे.संशयित नगरसेवक अल्ताफ पठाण याच्याफॉर्च्युनरमध्ये (एमएच ४४ टी ०२२१) आधीचकोयता आणि चाकू ठेवला होता. मन्सूरअलीयाला हॉटेलच्या बाहेर आणल्यानंतरनगरसेवक अल्ताफने धारदार कोयत्यानेत्याच्या गळ्यावर वार केला तर त्याचासाथीदार खालेद हमीद शेख याने सुऱ्यानेछातीत आणि पोटात ४ वार केले. तरतिसऱ्याने डोक्यात फरशी घातली. हॉटेलमध्ये जेवणासाठी जाताच हल्ला बुधवारी सकाळी ८ वाजता मन्सूरअलीहे मित्र शेख सत्तार शेख जब्बार वमजरखान नादरखान पठाण असे तिघेपरळीहून लातूरमार्गे बिदरला जाणारअसल्याची माहिती संशयितांनी काढलीहोती. पठाण याला बांधकामाचे साहित्यखरेदी करायचे होते. त्यामुळेसकाळपासूनच संशयित त्यांच्यापाळतीवर होते. तिघेही मित्र आधीकेजला गेले त्यानंतर रात्री लातूर शहरातहॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. आरोपी १५ मिनिटे मन्सूरवर कोयत्याने वार करत होते नगरसेवक अल्ताफ पठाण आणि त्याचे अन्य तीन मित्र आमच्या आधीच हॉटेलमध्येबसले होते. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा अल्ताफने आमच्याकडे रागात पाहिले आणिभांडायला सुरुवात केली. मी मन्सूरला हॉटेलबाहेर आणून गाडीत बसवत होतोतितक्यात अल्ताफने कोयता आणि त्याचा मित्र खालेदने सुरा घेऊन वार केले. १५मिनिटे ते वार करत होते. मी त्यांना रोखल्यावर माझ्या डोक्यात फरशी घातली.
Source link
तिघे संशयित पसार:वाळू व्यवसायातील 10 लाखांसाठीपरळीच्या तरुणाचा लातूरमध्ये खून, परळीच्या नगरसेवकाने पाळत ठेवत घडवले हत्याकांड