Headlines

प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी अन् विद्यार्थी ठरले पुरस्काराचे मानकरी:नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. क्षीरसागर यांची उपस्थिती‎




येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासाठी असलेल्या गुणवंत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांच्यासह डॉ. पंकज नागपुरे, प्रा. गजानन भारसाकळे, डॉ. रुपाली इंगोले, मुख्याध्यापक डॉ. चत्रभुज कदम, डॉ. वैशाली देशमुख, नितीन कडू, डॉ. कांचन ठाकरे, अर्चना ढोबळे, हेमंत पाथ्रीकर व काही विद्यार्थी या पुरस्कारांचे मानकरी ठरले. संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर, ॲड. जे. व्ही. पाटील पुसदेकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्रा. केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, प्रा. सुभाष बनसोड, सचिव डॉ. वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य डॉ. अमोल महल्ले, विजय ठोकळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांना स्व. पी. डी. चौधरी स्मरणार्थ उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देण्यात आला. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पंकज नागपुरे यांना स्व. बी. एस. उर्फ डॅडी देशमुख उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार देण्यात आला. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथील सहाय्यक प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनाही हाच पुरस्कार देण्यात आला. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथील डॉ. रुपाली इंगोले यांना स्व. वनमालाताई कोहळे स्मृती उत्कृष्ट महिला प्राध्यापक पुरस्कार देण्यात आला. वरुड येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक डॉ. चत्रभुज कदम यांना स्व. हिरोजी उलेमाले स्मृती उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय अमरावतीच्या शिवाजी बहुउद्देशीय शाळेच्या शिक्षिका अर्चना ढोबळे यांना स्व. जुगलकिशोरजी अग्रवाल उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला. श्री मन्नालाल गुप्ता विद्यालय, चांदूर रेल्वे येथील शाळेचे मुख्याध्यापक नितीन कडू यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून पुरस्कृत करण्यात आले. या विद्यार्थ्यांचाही गौरव संस्थेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटपही या कार्यक्रमात करण्यात आले. चित्रकला महाविद्यालयातून २०२४-२५ मध्ये प्रथम येणाऱ्या गुंजन धोटे, दुर्गा लांजेवार व दीपिका नानोटकर यांना स्व. अभिषेक बोंडे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. विज्ञान, संगणक व इलेक्ट्रॉनिक्सच्या पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शिवाजी महाविद्यालय, अकोटच्या अल्फिया परवीन शेख हसन, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाच्या हिमांशू मोकडे व झुबिया सदफ मसरूर जावेद यांचाही सत्कार करण्यात आला. महात्मा फुले महाविद्यालय, वरुडच्या दिव्या मानेकर यांचाही सत्कार करण्यात आला. वाणिज्य शाखेत प्रथम येणाऱ्या श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाच्या साक्षी काटोले हिला सुखदेवराव पाटील स्मृती पुरस्कार देण्यात आला. मराठी विषयात एम. ए. ला प्रथम येणाऱ्या शिवाजी महाविद्यालय, अकोटच्या कोमल हरणे हिला स्व. अनुराधा मुळे स्मृती पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *