![]()
एका तरुणाला थार गाडी अंगावरुन घालून मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या कारणावरुन टेंभुर्णी(ता. माढा) येथील झिरपे वस्तीवर दोन गट आमने सामने आले आहेत. गेल्या दोन दिवसापासून या गटात दोनदा हाणामारी झाली. एक चारचाकी तसेच ३ दुचाकी फोडण्यात आल्या. या प्रकरणी १२ ज
.
या प्रकरणात दोन्ही गटाकडून तक्रार दाखल नाही. पोलिसांकडून तक्रार दाखल करत पारस हवालदार,आप्पा आटकळे, अजय हवालदार, अमित देशमुख, अजित देशमुख, समाधान कोल्हे, निलेश देशमुख, रितेश देशमुख, किसन देशमुख, राहुल देशमुख,समाधान देशमुख, प्रतीक बंडू पाटील (रा. सर्व टेंभुर्णी ता. माढा) या बारा जणांविरोधात कलम 324(5),194 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झिरपे वस्तीवर हवालदार आणि देशमुख गटात हाणामारी झाली होती.यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले होते.याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात संबंधित लोकं आले असता गावातील पुढारी व कार्यकर्ते यांनी हस्तक्षेप करून वाद मिठवला होता. परंतु १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बेंबळे रोड जवळील बागवाले वस्तीजवळ रोडवर पुन्हा दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. यामध्ये महिंद्रा थार ( एमएच-१२ ईपी- ०३०३) ने एका स्कुटी वर असलेल्या यु्वकाला चिरडण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकाने गाडीवरून उडी मारली. या कारणावरुन पुन्हा दोन गटात जोरदार मारामारी,दगडफेक झाली. यामध्ये महिंद्रा थार, युनिकॉर्न मोटारसायकल (एमएच-४५ ए डब्ल्यू-0909) हिरो कंपनीची फॅशन प्रो ( एमएच-४५ ड्यु- 6078), होंडा कंपनीची अॅक्टीव्हा स्कुटी अशा चार गाड्यांवर दगडफेक करून फोडण्यात आल्या. यावेळी प्रचंड दगडफेक होत होती यावेळी अजय हवालदार याने ११२ वर कॉल केल्याने पोलीस घटनास्थळी फौजफाटा घेऊन आल्यानंतर संबंधित मारामारी, दगडफेक करणारे पसार झाले.पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड करीत आहेत.
या दोन गटात आठ दिवसापासून वादावादी होत आहे. दरम्यान हाणामारीत थार गाडीसह तीन मोटारसायकलची ही मोडतोड केली आहे.यामध्ये हाणामारी करणारे युवक २० ते २५ वयोगटातील होते. गाड्यांची मोडतोड केलेले फोटो,व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.