![]()
सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप मिररिंगद्वारे मालक आणि अकाउंटंट यांच्यातील जुने चॅटिंग वाचून संवादाची शैली हुबेहूब कॉपी करत ३.७० कोटींचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना संभाजीनगरात समोर आली आहे. भामट्याने व्हॉट्सॲपच्या डीपीवर मालकाच्या मुलीचा फोटो ठेवत त्यांच्या कोऱ्या धनादेशांवर सह्या करून ठेवण्याच्या सवयीचा फायदा घेतला. तक्रारदार दिगंबर सोपानराव माने (४२) यांच्या तक्रारीनुसार एसडी दवंडे इन्फ्रा प्रा. लि. च्या मालकांनी काही धनादेशांवर आधीच सह्या करून ठेवल्या होत्या. भामट्यांनी या माहितीचा आणि व्हॉट्सॲप चॅटच्या अभ्यासाचा पुरेपूर वापर केला. १४ आणि १५ सप्टेंबर रोजी या भामट्यांनी मालकाच्या नावाने अकाउंटंटला व्हॉट्सॲपवर मेसेज करून परराज्यातील वेगवेगळ्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. अकाउंटंटने खात्री न करताच ३.७० कोटी रुपये ट्रान्सफर केले. या प्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइलमध्ये लपलेले स्पायवेअर कसे ओळखाल? सेटिंगमध्ये नाव किंवा आयकॉन नसलेले ब्लँक अॅप त्वरित डिलीट करा. जास्त बॅटरी, डेटा वापरणारे अनोळखी अॅप स्पायवेअर असू शकते. ब्राउझरमधील ‘अननोन सोर्सेस’ इन्स्टॉलेशन बंद करा.डाउनलोडमधील अनोळखी फाइल काढून टाका. ‘टू पर्सन व्हेरिफिकेशन’ करणे आवश्यक फसवणूक होऊ नये म्हणून कंपन्यांनी टू पर्सन व्हेरिफिकेशन वापरावे. व्हॉट्सॲपऐवजी अधिकृत ई-मेल वापरावा. पैशांच्या मागणीची फोनवर खात्री करावी. अँटीव्हायरस वापरावे, जे रिस्की ॲप्सवर रेड मार्किंग दर्शवतात.-प्रसाद मुळे, सायबर तज्ज्ञ अकाउंटंटने काय खबरदारी घ्यायला हवी होती १४ सप्टेंबर, १०.०९ वा.: मागणी: बँक खात्यांचे बॅलन्स तपासा व स्क्रीनशॉट पाठवा. खबरदारी : अनोळखी नंबरवरून मेसेज आल्यावर डीपी पाहून स्क्रीनशॉट न पाठवता मालकाला मूळ नंबरवर कॉल करायला हवा होता. १४ सप्टेंबर, १०.३२ वा.: मागणी: परराज्यातील खात्यावर १.५ कोटी पाठवा. खबरदारी: सुटीमुळे प्रयत्न फसला, पण संशय घेऊन मालकाला विचारणा करणे आवश्यक होते. १५ सप्टेंबर, ०९.२१ वा.: मागणी: दुसऱ्या कंपनीच्या खात्यात १.७ कोटी पाठवा. खबरदारी: आरटीजीएस करण्यापूर्वी मालकाकडून व्हॉइस कन्फर्मेशन घेणे बंधनकारक होते. १५ सप्टेंबर, १३.०९ वा.: मागणी: हॉस्पिटलच्या खात्यात २ कोटी पाठवा. खबरदारी: मालकाने फोन उचलला नाही, याचा अर्थ त्यांना माहिती नव्हती. थेट संपर्काशिवाय स्वतःहून २ कोटी पाठवायला नको होते.
Source link
सायबरचोरांनी मालकाच्या मुलीचा डीपी ठेवून कंपनीचे 3.70 कोटी लांबवले:संभाजीनगरातील घटना, व्हॉट्सॲप मिररिंगद्वारे ‘फिशिंग’चा प्रकार