Headlines

परभणीमध्ये दोन दिवसांतच ‎दोन शेतकऱ्यांची आत्महत्या‎:जिंतूर तालुक्यातील वर्णा अन् शिंगणापूर गावातील घटना‎




पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने वाळून गेलेल्या ‎‎सोयाबीनमुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने‎घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही‎घटना बुधवारी १६ सप्टेंबरला जिंतूर‎तालुक्यातील वर्णा या गावात घडली. शेतात ‎‎वाळलेले सोयाबीन पाहून ते घरी परतले, नंतर ‎‎त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. तर शिंगणापूर ‎‎येथेही कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन ‎‎जीवनयात्रा संपवली. जिल्ह्यात दोन दिवसांत‎दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.‎ वर्णा या गावातील गट नंबर ३४३ च्या वाडी ‎‎शिवारात कोरडवाहू शेती करणारे हरिभाऊ ‎‎सुभानराव ढवळे (६२) यांचेही सोयाबीन‎वाळले होते. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून‎त्यांनी स्वतःच्या घरी गळफास घेऊन‎आत्महत्या केली. पोलिस पाटील डिगांबर‎अभुरे यांनी बोरी पोलीस स्टेशनचे एपीआय‎अभिजीत आइके यांना घटनेची माहिती दिली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन‎करण्यात आले. मृताच्या पश्चात हरिभाऊ‎ढवळे यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे‎असा परिवार आहे. मृताच्या कुटुंबाला‎शासकीय मदत मिळावी, अशी मागणी आहे.‎ वडिलांच्या नावावरील कर्ज‎फेडण्याच्या चिंतेतून गळफास‎ सततची नापिकी आणि वडिलांच्या नावे‎असलेल्या बँक कर्जाच्या झाडाला विवंचनेतून‎४५ शेतकऱ्याने वर्षीय गळफास घेऊन‎आत्महत्या केल्याची घटना शिंगणापूर येथे १७‎सप्टेंबरला उघडकीस आली. बाबासाहेब‎गोविंदराव गायकवाड (४५) असे मृताचे नाव‎आहे. वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज‎कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. याच‎मानसिक तणावातून गुरुवारी सकाळी त्यांनी‎घराजवळील आंब्याच्या झाडाला गळफास‎लावून आत्महत्या केली.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *