Headlines

नामपूर येथे नदीत पोहताना 2 तरुणांचा बुडून मृत्यू:मित्राचा जीव वाचवताना दुसरा तरुणही बुडाला, निमगावात पाचपैकी तीन जणांना वाचवण्यात यश




नामपूर येथे (जि.नाशिक,ता सटाणा) येथे पोहण्याचा मोह न आवारल्याने मोसम नदीपात्रात उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. अधिक माहितीनुसार नामपूर येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याजवळ ही घटना घडली. अथर्व दीपक पगार (१७, रा. उत्राणे) हा पाण्यात उतरला असता बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी मित्र ऋतिक दादाजी वाघ (१७, रा. शिवमनगर, नामपूर) याने पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. शेतकरी कृष्णा अहिरे यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर काळे घटनास्थळी दाखल झाले. नामपूर येथील युवकांच्या मदतीने अथर्वचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. निमगाव येथे मुंबईचे दोन तरुण बुडाले माढा | सोलापूर जिल्ह्यात निमगाव (मा. ता. माढा) येथे सिना नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या ५ तरुणांपैकी दोन तरुण नदीपात्रात बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.प्रफुल्ल गोपाळ गायकवाड (वय २५) व प्रतीक लक्ष्मण भालेराव (वय २३) सध्या रा. साकी नाका, मुंबई अशी बुडालेल्यांची नावे आहेत. भोइंजे येथील तरुण प्रवीण गायकवाड (वय ३०), त्याचा सख्खा भाऊ प्रफुल्ल गायकवाड (वय २५) यांच्यासह त्यांचा मावस भाऊ प्रतीक भालेराव (वय २३) व त्यांचे दोन मित्र मंगेश अंधारे (वय २७) व पिल्या खंडागळे (वय १५) हे पाच जण पोहण्यास गेले होते. त्यापैकी प्रफुल्ल गायकवाड व प्रतीक भालेराव यांचा बुडून मृत्यू झाला. इतर तिघांना वाचवण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *