Headlines

पाचोड‎:खादगावला गळफास घेत शेतकरी आत्महत्या




पैठण तालुक्यातील खादगाव येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकरी सिकंदर हाशम शेख (४८) यांनी स्वतःच्या शेतातील गट नंबर २९ मधील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पैठण तालुक्यासह परिसरात जून महिन्यापासून अत्यंत कमी पाऊस झाला आहे. अशाही परिस्थितीत सिकंदर शेख यांनी व्याजाने पैसे काढून खरिपाची पेरणी केली होती. मात्र, पावसाने मारलेली ओढ, पिकांची झालेली दुरवस्था, शेतीच्या मशागतीचा झालेला खर्च आणि सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेतून ते गेल्या काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होते. यातूनच त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शेतात जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले. घटना उघडकीस आल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *