Headlines

बलात्कार-खून होत असताना तुम्ही शांत का बसलात?:दिशा सालियनच्या वकिलांच्या दाव्यानंतर अखिल चित्रेंचे नारायण राणे, नितेश राणेंना 7 टोकदार सवाल




दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अधिकृत कागदपत्रांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा प्रचंड भूकंप झाला आहे. सतीश सालियन यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजात भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचा उल्लेख थेट ‘प्रत्यक्षदर्शी साक्षीदार’ (Eye Witnesses) असा केला असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. जर राणे पिता-पुत्र खरोखरच त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होते, तर सामूहिक अत्याचार आणि खून होत असताना ते शांत का बसले होते? असा संतप्त सवाल विचारत चित्रेंनी सोशल मीडियाद्वारे राणे कुटुंबीयांवर 7 टोकदार प्रश्नांची सरबत्ती केली आहे. नेमका दावा काय? न्यायालयातील कागदपत्रांचा दाखला अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर न्यायालयात सादर केलेल्या अधिकृत कागदपत्रांचा संदर्भ देत म्हटले की, सतीश सालियन यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या 12 जानेवारी 2024 च्या दस्तऐवजातील पान क्रमांक 233, मुद्दा क्रमांक 2 चा दाखला देत चित्रे म्हणाले, त्या कागदपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, “दिशा सालियन हिचा मृत्यू नैसर्गिक नसून सामूहिक अत्याचार करून नंतर खून करण्यात आल्याचे आरोप प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मा. नारायण राणे आणि मा. आमदार नितेश राणे व इतरांनी केले आहेत.” याचा सरळ अर्थ असा होतो की, सतीश सालियन यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार त्या कथित सामूहिक अत्याचाराचे आणि खुनाचे थेट प्रत्यक्षदर्शी नारायण राणे आणि नितेश राणे हेच आहेत. ही कोणतीही मीडिया ट्रायल नसून कोर्टात अधिकृतपणे सादर करण्यात आलेला कायदेशीर पुरावा आहे. अखिल चित्रे यांनी उपस्थित केलेले 7 महत्त्वाचे सवाल टॉवर लोकेशनची कोर्टात मागणी कशासाठी?; राणेंच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह अखिल चित्रे यांनी नितेश राणे यांच्या जुन्या वक्तव्यांवरही बोट ठेवले, “नितेश राणे सातत्याने माध्यमांसमोर ओरडून सांगत होते की, माझ्याकडे आदित्य ठाकरे यांचे टॉवर लोकेशन आहे. जर तुमच्याकडे पुरावे आधीच होते, तर मग आता न्यायालयात आदित्य ठाकरेंचे टॉवर लोकेशन मिळावे म्हणून नव्याने अर्ज का करावा लागला?” “2020 मध्ये घटना घडली त्या वेळी आदित्य ठाकरे हे राज्याचे कॅबिनेट मंत्री होते. प्रोटोकॉलनुसार त्यांच्यासोबत पूर्णवेळ मुंबई पोलिसांची झेड प्लस (Z+) सुरक्षा यंत्रणा तैनात होती. मग आदित्य ठाकरे तिथे हजर होते असा आरोप करताना, सोबत असलेल्या संपूर्ण शासकीय सुरक्षा यंत्रणेला आणि पोलिसांनाही राणे दोषी ठरवत आहेत का?” असा सवाल त्यांनी केला. सहा वर्षांनंतर अचानक मतपरिवर्तन कोणाच्या रसदीवर? सतीश सालियन यांच्या ताज्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना चित्रे म्हणाले की, सतीश सालियन यांची स्वतःची जुनी मुलाखत आजही उपलब्ध आहे, ज्यामध्ये त्यांनी ‘या घटनेबाबत मला कोणावरही आक्षेप नाही आणि तो एक अपघात होता’ असे स्पष्टपणे म्हटले होते. मग तब्बल सहा वर्षांनंतर अचानक त्यांचे हे मतपरिवर्तन कोणाच्या दबावातून झाले? आदित्य ठाकरेंना 500 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यामागे कोणाची राजकीय ताकद आणि कोणाची आर्थिक रसद कार्यरत आहे, याचे उत्तर जनतेला मिळायलाच हवे. या नव्या न्यायालयीन कागदपत्रांच्या आधारे ठाकरे गटाने थेट राणे पिता-पुत्रांनाच ‘प्रत्यक्षदर्शी’च्या मुद्द्यावर कायदेशीर व नैतिकदृष्ट्या घेरल्यामुळे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या वादाला आता एक वेगळेच आणि गंभीर वळण मिळाले आहे. ——————– हेही वाचा… कणकवलीतले खून पचवण्यासाठी यांना सत्ता हवी!: दिशा प्रकरणात ठाकरे कुटुंबावर चिखलफेकीसाठी अर्थपुरवठा कोठून होतोय? संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल “दिशा सालियन प्रकरणात केवळ ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून हा घाणेरडा राजकीय खेळ सुरू आहे. अब्रूची भाषा बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आमचीही प्रतिष्ठा आणि मानमर्यादा आहे. कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून आरोप करणाऱ्यांच्या पाठीशी कोणती अदृश्य शक्ती आहे आणि या संपूर्ण प्रकरणासाठी अर्थपुरवठा कुठून केला जातोय, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे,” असा सणसणीत प्रतिहल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *