एल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सोयाबीन, कापूस करपून गेला आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत नांदेड येथे दुष्काळ
.
बैठकीनंतर थेट बांधावर पोहोचलेल्या भरणेंना शेतकऱ्यांनी काजू-बदामची प्लेट देऊन घेराव घातला. काजू-बदाम खाण्यापेक्षा आम्हाला तत्काळ मदत करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर भरणे यांनीही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले.
कृषिमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
- कर्जमाफी, कर्जपुरवठ्याला गती द्या. चारा डेपो व पिण्याच्या पाण्याच्या टँकर्सचे नियोजन करा.
- एका आठवड्यात प्राथमिक पंचनामे, नुकसानीचे मूल्यांकन करा.
मदतीचे ठोस उत्तर द्या : शेतकऱ्यांची मागणी
टाकळगावला (ता. वसमत, जि. हिंगोली) शेतकऱ्यांनी कृषिमंत्री भरणेंना काजू-बदामची प्लेट देत संताप व्यक्त केला. “आमची पिके करपली आहेत. स्वप्ने भंग पावली आहेत. आमच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. बैठकीत बसून काजू-बदाम खाऊ नका. शेतकऱ्यांच्या मदतीविषयी ठोस उत्तर द्या. शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, असे शेतकऱ्यांनी खडसावले. त्यावर “राज्य सरकारकडून ज्या-ज्या योजनांमधून मदत करता येईल, त्या माध्यमातून मदत केली जाईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ अशी ग्वाही भरणे यांनी दिली.
सध्या पिकांच्या नुकसानीसोबत जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि चारा कमी पडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे भरणे यांनी सांगितले.
मधुमेही लोकप्रतिनिधींसाठी सुकामेव्याची प्लेट आली असावी : भरणे
बैठकीमध्ये आपल्यासमोर काजू-बदामची (सुकामेवा) प्लेट आली नव्हती. एखाद्या लोकप्रतिनिधीला मधुमेह असल्यामुळे त्यांच्यासाठी ती प्लेट आली असावी. त्यात काही चुकीचे नाही, असे कृषिमंत्री भरणे म्हणाले.

काजू-बदामावरून राईचा पर्वत करू नका : खा. जाधव पत्रकारांनी खासदार संजय जाधव यांना काजू-बदामाबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले की, ५० ते १०० रुपयांच्या बदामावरून राईचा पर्वत करू नका. दुष्काळ आहे म्हणून कुणी खात नाही का? काजू-बदाम खाल्ले तर काय झालं?