![]()
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या ४ प्रश्नपत्रिकांची अवघ्या ८ हजार रुपयांत विक्री झाली होती. आग्रा येथील (उत्तर प्रदेश) एका प्रिंटिंग प्रेसमधील कर्मचाऱ्यांनी चारही प्रश्नपत्रिकांचे संच बुटांच्या सोलमधून (तळव्यातून) लपवून बाहेर नेले होते. या आंतरराज्य रॅकेटप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने भिवंडी न्यायालयात ३,५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. २८ जून रोजी हे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १६ आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्यासह १८ जणांची नावे दोषारोपपत्रात आहेत. अशोक साव आणि प्रकाश मिसाळ हे दोन मुख्य सहकारी अजूनही फरार आहेत. २८ जून रोजी परीक्षेपूर्वी काही तास आधी पोलिसांना भिवंडीत प्रश्नपत्रिका विक्रीची माहिती मिळाली. त्यांनी डमी ग्राहक पाठवून सापळा रचला व संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जप्त केलेल्या ४ संचांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (एमएससीई) मूळ प्रतींशी पडताळणी केली असता, हे कागद हुबेहूब मूळ प्रश्नपत्रिकाच असल्याचे स्पष्ट झाले. झडतीत पायांकडे दुर्लक्षामुळे पेपरला पाय फुटले अतिरिक्त दोषारोपपत्र दाखल होईल या प्रकरणात मुख्य सूत्रधाराच्या नातेवाइकाच्या घरातून जप्त केलेली मूळ प्रश्नपत्रिका हा या पुरवठा साखळीचा मुख्य भक्कम पुरावा ठरला आहे. फरार दोन आरोपींचा शोध लागल्यावर अतिरिक्त/पूरक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल. ओडिशा ते महाराष्ट्र यंत्रणेतील त्रुटी उघड या पेपरफुटीने गोपनीय प्रिंटिंग प्रेसची निवड, तेथील सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या तपासणीतील त्रुटी उघड झाल्या. प्रिंटिंग प्रेसमध्ये बॉडी स्कॅनर्स, २४x७ सीसीटीव्ही हवेतच असेही लक्षात आले. एकुणात ओडिशा ते महाराष्ट्र सरकारी यंत्रणा कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले. आठ हजारांत विकल्या चार प्रश्नपत्रिका गुप्ता याच्या बिहारमधील नातेवाइकाच्या घरातून मूळ प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याने, पोलिसांना या साखळीचा ‘क्लासिक फिजिकल एव्हिडन्स’ मिळाला आहे.
सोलमध्ये कप्पा तयार करून घेतला होता
Source link
बुटात लपवून टीईटीचे 4 पेपर प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी फोडले:ठाणे पोलिसांकडून 83 दिवसांत 3,500 पानांचे आरोपपत्र दाखल