![]()
राज्यातील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांची कन्या नीला विखे पाटील (४१) यांची स्वीडनच्या रिक्सडाग या संसदेत खासदार झाली. त्यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून निवडणूक जिंकली. नीला या ग्रीन पार्टीच्या सक्रिय सदस्य असून त्या स्टॉकहोम नगर परिषदेच्या सदस्यही राहिल्या आहेत. स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला यांनी सुरुवातीची वर्षे अहिल्यानगरमध्ये घालवली. त्या माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात व राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत. त्यांनी स्वीडिश पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणूनही काम केले. बालकल्याण व पर्यावरणाला प्राधान्य असेल, असे नीला म्हणाल्या.
Source link
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार:स्टॉकहोम सिटीतून मिळवला मोठा विजय