Headlines

हर्षीत 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:कारण अस्पष्ट, पाचोड पोलिसांमध्ये घटनेची नोंद‎




पैठण तालुक्यातील हर्षी खुर्द येथे संकेत लहू पवार (२६) या तरुणाने रविवारी राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मृत संकेत पवार हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नातेवाईक कामानिमित्त बाहेर गेले असल्याने संकेत घरी एकटाच होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारी व्यक्ती काही कामानिमित्त त्याच्या घरी गेली असता, संकेतने घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तत्काळ पाचोड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संकेतला फासावरून खाली उतरवले आणि उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. घटनेची नोंद पाचोड ठाण्यात केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *