![]()
जामनेर आगारात जागा नसल्याने एस.टी. महामंडळाला चार्जिंग स्टेशन उभारणे शक्य झाले नाही. यामुळे मात्र इतर डेपोतील जुन्या झालेल्या खटारा गाड्यांमधून प्रवास करण्याची वेळ जामनेरातील प्रवाशांवर आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून बसपोर्टचे काम रखडले असून जामनेर ब
.
जामनेर एसटी डेपोसह आगाराची मिळून तब्बल तीन एकर जागा आहे. २०१७ साली शासनातर्फे १४ कोटी रुपये निधी मंजूर करून एअरपोर्टच्या धर्तीवर बस पोर्ट निर्मितीसाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र तेव्हापासून बस्पोर्टचे काम अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. बस स्थानकातील पंखे बंद असल्याने प्रवाशांना उकाडा सहन करावा लागत आहे. तर सीसीटीव्ही नसल्याने चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या आठ वर्षांपासून काम रखडलेल्या जामनेर बसपोर्टमध्ये प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्याचबरोबर स्वच्छतागृह मधोमध बांधून ठेवल्याने प्रवासी बसण्याच्या जागी अनेक वेळा दुर्गंधी येते. अशा एक ना अनेक समस्यांनी जामनेरचे बस पोर्ट समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.
स्वच्छतागृहाची गैरसोय
^वाढत्या चोरांचे प्रमाण पाहता सीसीटीव्ही बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नवीन पंखे मागवले आहे. काही लवकरच दुरुस्त करून घेऊ. चार्जिंग स्टेशनसाठी आवश्यक तेवढी जागा नसल्याने चार्जिंग स्टेशन उभारणे शक्य नाही. त्यामुळे आहे त्याच बसेसवर प्रवासी वाहतूक करावी लागत आहे. – दिनेश नाईक, डेपो मॅनेजर, जामनेर.