Headlines

'आमदार शिव्या देतो म्हणून त्याचे गुलाम झालात का?':बाळासाहेब थोरात प्रांताधिकाऱ्यांवर भडकले; काँग्रेसच्या 'जन आक्रोश मोर्चा'त मोठा गोंधळ




अहिल्यानगरमध्ये आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वीज प्रश्नावरून भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर अधिकारी जागेवर नसल्याने मोर्चेकरी प्रचंड संतप्त झाले आणि त्यांनी ‘खाली या… खाली या…’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तणाव वाढला. या गोंधळात आंदोलकांसोबतच खुद्द बाळासाहेब थोरात यांचाही संयम सुटला आणि तेही प्रांताधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत भडकल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. प्रांताधिकाऱ्यांवर राग व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, आमदार शिव्या देतो म्हणून त्याचे गुलाम झालात का? दादागिरीने तुम्ही गुलाम होत असाल, तर लोक तेच करतील. आमदाराचा फ्लेक्स लावायला तुम्ही कशाला जायचे? असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला. संगमनेरमध्ये प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांसह बाळासाहेब थोरात संतापल्याचे पाहायला मिळाले. तसेच रोष वाढत असल्याचे पाहून प्रांत अधिकारी उपस्थित झाले, त्यानंतर थोरात याणणू त्यांना चांगलेच सुनावले. अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांत अधिकारी उपस्थित न राहिल्याने आंदोलक प्रचंड आक्रमक झाले. या संतापलेल्या आंदोलकांनी थेट कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न करत प्रांत अधिकाऱ्यांची खुर्ची भिरकावून दिली. मोर्चेकरांचा हा वाढता रोष लक्षात घेता अखेर प्रांत अधिकारी अरुण मुंडे यांनी स्वतः आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रांत अधिकारी आणि वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांना शांत केल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला. शेतमजुराला देखील मदत झाली पाहिजे आंदोलनावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, खोट्या द्यायच्या, दिशाभूल करायची असा सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. शतकरी नव्हे तर शेतमजुराला देखील मदत झाली पाहिजे. पंचनामे न करता सरसकट पाऊस नसल्याने सरसकट मदत दिली पाहिजे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना देखील वीज नसल्याने पाणी मिळत नाही. आमच्या त्यावेळी केलेल्या लढाईमुळे संगमनेरला 30 टक्के पाणी मिळाले. अजूनही शेतकरी जागा व्हायला तयार नाही. फ्लेक्स लावून शेतकऱ्याचे पोट भरणार नाही पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही निळवंडे धरण कसे पूर्ण केले हे आम्हाला माहीत आहे. धरणाच्या कालव्यांना सीमेंट काँक्रेट केल्याने विहिरात पाणी उतरत नाही.हक्क मिळाला नाही तर ठिय्या मांडण्याची तयारी आता आपण सर्वांनी ठेवावी. इथल्या निष्क्रिय माणसाची चर्चा करण्यात अर्थ नाही. पाण्यावर एक शब्द तरी हा गडी बोलला का? काय केलं तर गावभर फ्लेक्स लावले.. फ्लेक्स लावून शेतकऱ्याचे पोट भरणार नाही, अशा शब्दात थोरात यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *