![]()
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला आणि जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा नुकत्याच जय बजरंग विद्यालय, कुं
.
स्पर्धेचे उद्घाटन बजरंगबलीच्या प्रतिमेचे तसेच रोप व लाकडी मल्लखांबाचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण बिरकड गुरुजी होते. उद्घाटन माजी सरपंच बाळासाहेब अतकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे, प्राचार्य डॉ. सूर्यभान नागुलकर, राजूभाऊ उगवेकर, आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू जानराव आगळे, मोहन भातरकर, ममता नेमाडे, अविनाश पाटील, बजरंग गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत ग्रामीण व शहर भागातील शाळांमधील खेळाडूंनी मल्लखांबावर लवचिकता, ताकद आणि समन्वयाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विविध कसरती सादर करून खेळाडूंनी उपस्थितांची दाद मिळवली. समारोपीय कार्यक्रमात विजेत्या व प्राविण्यप्राप्त खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान करून गौरवण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू जानराव आगळे, मोहन भातरकर, श्रीकृष्ण चिंचोलकर, बी. एस. तायडे, ममता नेमाडे, अविनाश पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक बी. एस. तायडे यांनी केले. आभार बजरंग गावंडे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नारायण धनाग्रे, सचिन देशमुख, जगदीश साठे, शिवराज श्रीनाथ, भावेश आगळे, उज्वल इंगळे, शिवम बाकोडिया, सोहम ढोक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ग्रामीण व शहरी भागांतील शाळांमध्ये वाढली चुरस जिल्हास्तरीय स्पर्धेत अकोला शहर व ग्रामीण भागातील अनेक नामांकित शाळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने कोठारी कॉन्व्हेंट अकोला, न्यू इंग्लिश स्कूल अकोला, जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद, श्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव, क्रीड्स पॅराडाइज स्कूल पातूर, यजमान जय बजरंग विद्यालय कुंभारी या शाळांतील १४, १७ व १९ वर्षांखालील मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले.