आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. प्रामुख्याने पिण्याचे पाणी, रोजगार, जनावरांसाठी चारा आणि शेतीचे झालेले नुकसान यासाठी सरकार योग्य निर्णय घेईल, असे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.विजय वडेट्टीवार यांचे सरकार असताना ते कधी शेतावर गेले न
.
रावसाहेब दानवे म्हणाले की, कल्याण काळे हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात किती दिवसांनी दुष्काळ पाहण्यासाठी आले? त्यांच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासारखे काहीच नाही. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार नाही, आमचे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार. शेतकऱ्यांचे समाधान आम्ही पूर्णपणे केले.
शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान
रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठवाड्यात या वेळेस सरासरीपेक्षा खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला. यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांकडे पाठ फिरवली आहे, यामुळे हाती आलेले पीक शेवटच्या टप्प्यात वाया गेले आहे. आता जरी पाऊस आला, तरी पिके घेता येणार नाहीत. शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे की, शेतकऱ्यांच्या बांधावर जा आणि काय परिस्थिती आहे, याचा आढावा घ्या.

राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणार
रावसाहेब दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. त्या समितीला मंत्रिमंडळाचे अधिकार देण्यात आले आहेत, त्यामुळे समस्या त्यांच्यासमोर जातील. एनडीआरएफच्या मदतीची वाट न बघता आता राज्य सरकारकडून मदत केली जाणार असून, अहवाल गेल्यावर एनडीआरएफकडून मदत मागितली जाईल.
राऊतांकडे दुर्लक्ष करा
रावसाहेब दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बांधावर जात तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आम्ही तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घालू. संजय राऊत यांच्याकडे दुर्लक्ष करा, सरकारकडे सर्व काही रेकॉर्ड आहे. विशेष अधिवेशन घेण्याची गरज आहे का नाही, हे सरकार ठरवेल; पण विशेष अधिवेशनात जे निर्णय घेतले जातात ते असेही घेता येतात, त्यांना येणाऱ्या अधिवेशनात मान्यता देता येते.
हे ही वृत्त वाचा ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचे छोटा शकील:निवडणूक आयोगातून लोकशाहीची हत्या सुरू, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही- राऊत

ज्ञानेश कुमार हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे छोटा शकील आहेत, मग इतरांना काय म्हणायचे ते तुम्ही ठरवा. पण अमित शहांच्या निवडणूक आयोगातील छोटा शकीलकडून लोकशाहीची हत्या करण्याचे काम सुरू आहे, त्यांना राजीनामा देत घरी जावे लागेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर