Headlines

अंधार दूर करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती:जय आनंद महावीर‎युवक मंडळाचा उपक्रम‎




गणेशोत्सवात अखंड व सुरक्षित वीजपुरवठा महत्त्वाचा असतो. सायंकाळनंतर गणेशमूर्ती व देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने वीजपुरवठ्यातील बिघाड दूर करणे आवश्यक असते. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील नवीपेठ परिसरातही उत्सव काळात मोठी गर्दी होत असल्याने महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सतर्क राहतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत जय आनंद महावीर युवक मंडळाने यंदा महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना गणपतीच्या आरतीचा मान दिला. नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या गणेशोत्सवात तेलीखुंट पॉवर हाऊस येथील महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी डॉ. रोहन धर्माधिकारी, माधुरी मानकर, कुशल पडोळे, शरद सोनवणे, भावेश हराळे, आकाश माळी, आदर्श बोरकर, भोसले यांच्यासह नवीपेठ येथील जैन धर्मशाळेचे अध्यक्ष बाळासाहेब भंडारी, संदीप चोपडा, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, कार्याध्यक्ष सत्येन मुथा, सेक्रेटरी आनंद मुथा, बाबालाल गांधी, अजित गांधी, प्रकाश गांधी, नितीन मुनोत, संतोष कासवा उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात विशेषतः सायंकाळनंतर नवीपेठ परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. या काळात सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तत्परतेने सेवा देतात. त्यामुळे त्यांना आरतीचा मान देताना विशेष आनंद होत आहे. सत्येन मुथा म्हणाले, मंडळाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून पारंपरिक पद्धतीने भव्य गणेशोत्सव साजरा केला जात आहे. उत्सव काळात सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळातर्फे महावितरणच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बाळासाहेब भंडारी यांचा सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *