Headlines

सिलिंडरमधून ऑटोमध्ये रिफिलिंग करणाऱ्या 5 जणांवर गुन्हे:स्थानिक गुन्हे शाखेने 12 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎



घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरमधून प्रवासी ऑटो रिक्षांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या पाच जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, चार ऑटो रिक्षांसह तब्बल १२ लाख ३१ हज

.

शेख जमीर शेख अल्लाउद्दीन (३०), अल्तमश खान शब्बीर खान (२३), अब्दुल कय्युम शेख मेहबुब (४२), रविंद्र गोविंदराव वानखडे (५७) आणि शेख मुन्ना शेख शब्बीर (२४, सर्व रा. नांदगाव खंडेश्वर) यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, बहिरम बाबा टेकडीजवळ, चांदूर रेल्वे रोड येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने ऑटो रिक्षात अवैध गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी शेख जमीर हा विनापरवाना घरगुती सिलिंडरमधून गॅस भरताना रंगेहात पकडला गेला. तसेच इतरही तेथे आपल्या रिक्षात गॅस रिफिलिंग करण्यासाठी हजर असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी जप्त केलेले घरगुती गॅस सिलिंडर अत्यंत ज्वलनशील असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक गॅस एजन्सीच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय अशोक लांडे, पीएसआय सतीश झाल्टे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, हर्षल काळे आणि संजय प्रधान यांच्या पथकाने केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *