![]()
पावसात पडलेला खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आले. त्यांनी खामगाव तालुक्यातील कोलारी आणि मोताळा तालुक्यातील खडकी खामखेड, रोहिणखेड व टाकळी येथे भेट देऊन पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, पिकाचे नुकसान याविषयी माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. काही शेतांमध्ये १०० टक्के नुकसान झाले असून शेंगांमध्ये दाणे भरले नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री आकाश फुंडकर, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय गायकवाड, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले असून, पंचनाम्यांची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांची पीक विमा व शासकीय मदतीची मागणी विचारात घेऊन दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती मदत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. खामगाव | तालुक्यातील कोलोरी परिसरातील शेतशिवारात २३ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पावसाच्या खंडामुळे करपलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. “सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून काळजी करू नका, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली जाईल,” असा धीर त्यांनी यावेळी दिला. या पाहणी दौऱ्याप्रसंगी त्यांच्यासोबत राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. “टोकाचे पाऊल उचलू नका शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “पिकांचे नुकसान झाले असले तरी कोणत्याही शेतकऱ्याने खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलू नये. केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारकडूनही वेळोवेळी विविध योजनांतून मदत मिळाली असून, राज्य सरकारकडूनही नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्राच्या माध्यमातून मदत दिली जाते केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’सह राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. सद्यस्थितीतही केंद्र शासनाकडून राज्याला मदत मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. संकटात बळीराजाने टोकाचे पाऊल उचलू नये.
Source link
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळी स्थितीचा घेतला आढावा:कोलारी, खडकी खामखेड, रोहिणखेड, टाकळी येथे केली पाहणी