Headlines

ऑनलाइन सर्च करुन ज्वेलर्स फोडणाऱ्या टोळीला पकडले:शहरात एका रात्री 3 सराफा दुकाने फोडणाऱ्यांना बेड्या‎




शहराची माहिती नसताना ऑनलाइन सर्च व गुगल मॅपचा वापर करुन ज्वेलर्स हेरायचे. त्यानंतर मध्यरात्रीला संधी साधून फोडायचे आणि ऐवज लंपास करायचा, अशा सराईत आंतरराज्यीय टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या टोळीने एकाच रात्री शहरातील तीन ज्वेलर्स फोडले होते. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्या चोरट्यांकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोशनसिंग बबलुसिंग टाक (२४, देऊळगाव राजा), हरिंदरसिंग संतोषसिंग दुधाणी (२४, शेंदला, मेहकर),गणेश जनार्धन मानवतकर (३२, शेंदला, मेहकर) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. ११ सप्टेंबरला रात्री शहरातील गाडगेनगर, फ्रेजरपुरा व राजापेठ ठाण्याच्या हद्दीत तीन ज्वेलर्स दुकाने फोडण्यासह मोटारसायकल या त्रिकुटाने शहरात चोरली होती. त्यांच्याकडून ४ किलो चांदी, सोन्याची लगड, बेसर, दुचाकी, रोख रक्कम व घरफोडीचे साहित्य असा १६ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त केला.या टोळीला गुन्हे शाखेचे पीआय अतुल वर व पीआय दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी २५० कि.मी. पाठलाग करत ३५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून ही टोळी बुलढाण्यातील रेकॉर्डवरील असल्याचे समोर आले. संशयितांचा वाशीम, यवतमाळ, हिंगोली, अकोल्यासह गुजरात राज्यातील सुरतपर्यंत माग काढला.दरम्यान, २३ सप्टेंबरला हे चोरटे दुचाकीने नागपूरकडे जात असल्याचे कळ ताच, पोलिसांनी नवीन एक्सप्रेस हायवेवर दोन पथके तैनात केली. पाठीवर कॉलेज बॅग लटकवून ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी तीन ज्वेलर्स फोडल्याची कबुली दिली.त्यांच्या बॅगेची झडती घेताना कटर, टामी, टॉर्च, ‘केसांचा विग’ सापडला. चोरी करताना सीसीटीव्हीत ओळख लपवण्यासाठी चोरटे विग वापरायचे, पाठीवर कॉलेज बॅग अडकवून ‘विद्यार्थी’ असल्याचे भासवत रेकी करून मुद्देमाल पळवायचे. तीन चोरट्यांविरुद्ध पाच जिल्ह्यात १८ गुन्हे नोंद हे तिन्ही चोरटे सराईत असून, तिघांविरुद्ध अमरावतीसह अकोला, लातूर, बुलढाणा व वाशीम या पाच जिल्ह्यांत १८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी रोशनसिंग टाकविरुद्ध ६, हरिंदरसिंग दुधानेविरुद्ध ७ , गणेश मानवतकर विरुद्ध ५ अशा गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *