Headlines

गणेश विसर्जन शिस्तबद्ध करा:दुष्काळग्रस्तांना सरकार लवकरच मदत देणार, दगडूशेठच्या दर्शनानंतर सुनेत्रा पवारांचे आश्वासन




अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आज राज्यभरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दगडूशेठची विधीवत पूजा आणि अभिषेक केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुणेकरांना पर्यावरणपूरक विसर्जनाचे आवाहन केले, तसेच राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करत बळीराजाला मोठा दिलासा दिला. ‘पुण्याचे विसर्जन जगभरात प्रसिद्ध’ पुण्याच्या गणेशोत्सवाचे आणि इथल्या परंपरेचे कौतुक करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पुण्यातले गणेशोत्सव आणि विसर्जन हे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हे विसर्जन बघण्यासाठी जगभरातील लोक आतुरतेने वाट पाहत असतात. पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तर ती श्रद्धा, संस्कृती आणि अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, ज्याचे दर्शन आजच्या दिवशी घडते.” त्यांनी सर्व गणेश मंडळे आणि पुणेकरांना विनंती केली की, यंदाचे विसर्जन अतिशय चांगल्या पद्धतीने, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पाडावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कृत्रिम कुंडामध्ये जास्तीत जास्त पर्यावरणपूरक विसर्जन करावे, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. ‘दुष्काळावर सरकार अतिशय गंभीर’ राज्यात परतीच्या पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीवरही सुनेत्रा पवार यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, शासन या परिस्थितीबाबत अतिशय गंभीर असून, त्या दृष्टीने सर्व नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. पाणीटंचाई, गुरांचा चारा आणि पशुपालक शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासनाने सर्व यंत्रणांना स्पष्ट आदेश दिले आहेत.” ‘लवकरच थेट मदत मिळणार’ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुरू असलेल्या दुष्काळी पाहणी दौऱ्यांचा संदर्भ देत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. “कालच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत आढावा घेतला आहे. या परीक्षणानुसार सरकारकडून लवकरात लवकर दुष्काळग्रस्तांना थेट मदत दिली जाईल,” अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. पुढच्या वर्षी लवकर या!: राज्यभरात अनंत चतुर्दशीचा अभूतपूर्व उत्साह, मुंबई-पुण्यात ढोल-ताशांचा गजर; 5 कोटी भाविक रस्त्यावर गेल्या दहा-बारा दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने पुजल्या गेलेल्या आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण अखेर आला आहे. आज अनंत चतुर्दशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या एकाच जयघोषाने राज्यातील प्रमुख शहरे आणि गावे दुमदुमून गेली आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *