Headlines

Satara Shahupuri Police Inspector & Constable Caught In ACB Bribe Trap


आकाशपाळणा उभारणीच्या ना-हरकत परवान्यासाठी लाचेची मागणी करून तडजोडीअंती 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातारा येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार दीपक लक्ष्मण पोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या लाच प्रकरणात तक्रा

.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका 38 वर्षीय व्यावसायिकाने सातारा शहरातील आळूचा खड्डा येथे आकाशपाळणा लावण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात ना-हरकत परवान्यासाठी अर्ज केला होता. परवान्याच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार गोपनीय विभागात कार्यरत असलेले पोलिस हवालदार दीपक पोळ यांना भेटले असता, त्यांनी पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने नाईलाजाने 15 हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम दोन दिवसांत देण्याचे सांगितले. त्यानंतर उर्वरित 15 हजार रुपयांसाठी हवालदार पोळ यांनी तगादा लावल्याने तक्रारदाराने 23 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 23 सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पंचांसमक्ष पडताळणी केली असता, हवालदार दीपक पोळ यांनी पोलिस निरीक्षकांसाठी व स्वतःसाठी तडजोडीअंती 11 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याच पडताळणी दरम्यान पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनीही या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे समोर आले.

त्यानंतर काल दि. 24 सप्टेंबर रोजी सातारा येथील राजवाडा परिसरातील जुना दवाखाना येथे एसीबीने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार दीपक पोळ याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक शैला कोरडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

हे ही वृत्त वाचा

ठाणे हादरलं:गस्तीवर असताना पोलिस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला, मद्यपी गावगुंड अटकेत

ठाण्यात रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना गस्त घालणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाची गावगुंडाने धक्काबुक्की करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरात पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर रात्रीच्या सुमारास परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यादरम्यान परिसरातील काही दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर सुरू असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.