![]()
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर परतणाऱ्या चालत्या ट्रॅक्टरवर चढण्याचा प्रयत्न करताना तोल गेल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्यामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी बी. टी. कवडे रस्त्यावरील काळूबाई चौकाजवळ विजय सेल्ससमोर घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. विघ्नेश संतोष पवार (वय २०, रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश विसर्जन करून परतणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागे विघ्नेश धावत होता. चालत्या ट्रॅक्टरवर चढण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याचवेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह कमांड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला. शनिवारी (२६ सप्टेंबर) मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्राथमिक पडताळणीत विघ्नेश स्वतः चालत्या ट्रॅक्टरच्या मागे धावत जाऊन त्यावर चढण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडला आणि चाकाखाली आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. मसाप, साहित्य अकादमीतर्फे सोमवारी ‘नारी चेतना’ महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य अकादमीतर्फे ‘नारी चेतना’ या मराठी कविता वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. नीलिमा गुंडी, अंजली कुलकर्णी, दीपाली दातार, तन्वी जगदाळे कवितांचे सादरीकरण करणार आहेत. साहित्य अकादमी मराठी परामर्श मंडळाच्या सदस्य स्नेहा अवसरीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी सांगितले आहे.
Source link
चालत्या ट्रॅक्टरवर चढताना तोल गेला, तरुणाचा मृत्यू:पुणे बी. टी. कवडे रस्त्यावर गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर परतणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात