![]()
शहरातील एका प्लॉटच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन एकमेकांच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २५) रात्री घडली. एकाने तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या गटाने कारचालकावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आकाश भरत सूर्यवंशी आणि शुभम अरुण माने यांच्यात एका प्लॉटवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रेल्वे लाईन रस्त्यावरील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर दोन्ही गट आमनेसामने आले. प्लॉटच्या वादातून झालेला हा रक्तरंजित थरार थेट एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या समोरच घडल्याने खळबळ उडाली आहे. अंगावर थेट कार घालणे आणि त्यानंतर फिल्मी स्टाईलने कोयत्याने प्राणघातक हल्ला करणे, यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे
Source link
लातूर:प्लॉटच्या वादातून अंगावर कार घातली, कोयत्याने सपासप वार