Headlines

अहिल्यानगर‎:यंदा साडेबारा तास विसर्जन मिरवणूक




दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात गणेश िवसर्जन मिरवणुकीत उत्साह पाहायला मिळाला. यंदा साडेबारा तास मिरवणूक सुरू होती. गतवर्षीपेक्षा यंदा दोन तास कमी मिरवणूक चालली. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरावर बंदी घातली होती. मात्र, शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती वगळता अन्य मानाच्या गणापतींपैकी तब्बल ८ मंडळांनी डीजे वाजवला. शहराचे ग्रामदैवत विशाल गणेश मंडळाची उत्थापन पूजा सकाळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते पार पडली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर आणि अन्य विश्वस्त उपस्थित होते. मानाचा पहिला गणपती रामचंद्र खुंटावर आल्यावर तेथून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक सुरू झाली. युगंधर व रुद्रनाथ ढोल पथकांचे सादरीकरण आणि विद्यार्थ्यांच्या लेझीम नृत्याने उपस्थितांचे मन जिंकले. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या, पुष्पवृष्टी करण्यात आल्याने मंगलमय वातावरण होते. ग्रामदैवत विशाल गणपतीच्या मंडळाची पारंपरिक मिरवणूक. मिरवणुकीमध्ये हस्तक्षेप टाळला यंदा प्रतिष्ठापनेच्या दिवशी पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई करत डीजे बंद पाडले. मात्र, दोन दिवसांपूर्वी भिंगारमध्ये विसर्जन मिरवणुकीत झालेला लाठीमार, त्यामुळे निर्माण झालेला तणाव आणि रस्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी शहरातील मिरवणुकीत फारसा हस्तक्षेप करण्याचे टाळले. डीजे बंद न केल्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांना मनसोक्त नृत्योत्सव साजरा करण्याची संधी मिळाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *