Headlines

लासलगाव‎:विंचूरला रायगड ग्रुपच्या विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांची गर्दी




विंचूर येथील रायगड ग्रुपच्यागणरायाची विसर्जन मिरवणूकजल्लोषात पार पडली. मिरवणूक सुरू झाल्यापासून विंचूरच्या प्रमुख रस्त्यांसह अनेक गल्ल्यांमध्येही नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. बाप्पाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी महिला, पुरुष, युवक, युवती तसेच लहान मुलांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. दीपक बँड गलंगी यांच्या दमदार वादनाने आणि सुप्रसिद्ध गायिका मेघा रमाकांत कापडणीस (मुसळे) यांच्या उपस्थितीने मिरवणुकीतील उत्साह आणखी वाढला. ढोल-ताशांचा गजर, बँडचे वादन आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषाने संपूर्ण विंचूर दुमदुमून गेले.नागरिकांची गर्दी आणि गणेशभक्तीचे उत्साही वातावरण पाहायला मिळत होते. रायगड ग्रुपच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनामुळे हा विसर्जन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *