![]()
प्रतिनिधी | पंढरपूर चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपण्यासाठी पंढरपूरमधील सायकलर्स ग्रुप, वृक्षप्रेमी ग्रुप, डॉक्टर ग्रुप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने चंद्रभागा नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ‘चला बदल घडवूया, एक पाऊल निसर्गासाठी’ आणि ‘एक दिवस चंद्रभागा नदी स्वच्छतेसाठी’ या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला. गणेशोत्सवानंतर चंद्रभागा नदीपात्रात विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती, निर्माल्य तसेच नदीकाठावर टाकण्यात आलेले कपडे गोळा करण्याचे काम या मोहिमेअंतर्गत करण्यात आले. यावेळी चंद्रभागा घाट, महाद्वार घाट आणि दत्त घाटासमोरील नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या परिसरात विसर्जन करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील गणेशमूर्ती गोळा करण्यात आल्या. तसेच नदीकाठावर टाकलेले कपडेही संकलित करण्यात आले. पंढरपुरात नगरपालिकेकडून मूर्ती संकलन केंद्रात सात हजारहून अधिक गणेश मूर्तींचे संकलन केले. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनीही गणेश मूर्ती दान दिल्या. यासाठी पालिकेने यंत्रणा उभी केली होती. तेथे घरगुती गणेश मूर्ती आणून जमा केल्य जात होत्या. यशिवाय सार्वजनिक मंडळांनीही मूर्ती जमा केल्या.
Source link
निर्माल्य काढून चंद्रभागा निर्मलतेसाठी झटले शेकडो हात:गणेश विसर्जनानंतर चंद्रभागा स्वच्छतेसाठी विविध संस्थांनी घेतला पुढाकार, 7000 मूर्तींचे संकलन