Headlines

गांधी जवाहर बागेत रविवारी ‘सत्यशोधक चरखा संगम’:चर्चा आणि सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा उपक्रम; परिवर्तनाच्या पैलूंवर मंथन करणार‎



सामाजिक विषयांवर संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने अकोल्यात दर रविवारी ‘सत्यशोधक चरखा संगम’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात रविवार, २७ सप्टेंबरपासून गांधी जवाहर बाग येथे करण्यात आली आहे. सकाळी

.

‘सत्यशोधक चरखा संगम’च्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर सहभागी होणाऱ्या मान्यवरांशी चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण केली जाणार आहे. समाजातील विविध प्रश्नांकडे सकारात्मक आणि चिकित्सक दृष्टीने पाहण्यासाठी एकत्रित संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. दर रविवारी इच्छुक साथीदारांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्न, नागरिकांची भूमिका, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ चर्चा न करता सहकार्य आणि सामाजिक सहभागाची भावना वाढीस लागावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

दि.२७ रोजी झालेल्या चर्चासत्रात अकोल्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती लावली. विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती होती. हा उपक्रम असाच दर रविवारी पार पडणार असून नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चरख्याच्या माध्यमातून स्वावलंबनाचा संदेश या उपक्रमात चरखा हे स्वावलंबन, श्रम आणि परिवर्तनाचे प्रतीक म्हणून असणार आहे. सहभागी नागरिकांना चरख्याची ओळख करून देण्याबरोबरच प्रत्यक्ष चरखा चालविण्याचा अनुभव घेता येणार आहे. चरख्याच्या माध्यमातून श्रम, स्वावलंबन आणि सामूहिक सहभाग या मूल्यांवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच पुस्तक वाचन केले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *