Headlines

दोन वर्षांपूर्वीचे 400 रुपये टप्प्याटप्प्याने देणार‎:श्री विठ्ठल कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभप्रसंगी आमदार अभिजित पाटील यांची माहिती




कामगारांना सप्टेंबर २०२६ पासून १० टक्के पगारवाढ लागू करण्यात येणार असून, दिवाळीनिमित्त एका महिन्याचा पगार म्हणजेच ८.३३ टक्के बोनस देण्याची घोषणा त्यांनी केली. ऊस उत्पादकांना हंगाम २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या प्रतिटन ३५०० रुपयांपैकी उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. कारखान्यामार्फत श्री विठ्ठल कृषी महाविद्यालय सुरू झाले असून, शैक्षणिक संकुलात विविध महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच बायोसीएनजी प्रकल्प कार्यान्वित झाला असून, पुढील वर्षी चार टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या गळीत हंगामात कारखाना प्रतिदिन १२ हजार ५०० मे. टन गाळप क्षमतेने चालविण्याचे नियोजन आहे. मागील दोन वर्षांत ८० कोटी रुपयांची गुंतवणूक करून आधुनिकीकरण व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. कारखान्यावरील कर्जाची परतफेड करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देणार असल्याचे प्रतिपादन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. अभिजित पाटील यांनी केले.श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ४५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आणि मोळीपूजन कार्यक्रम शनिवारी (दि. २६) उत्साहात संपन्न झाला. कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सहकारातून आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सभेपूर्वी प्रा. श्रीगुरू बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्ष सौ प्रेमलता पाटील, डॉ.प्रा. बी पी रोंगे यांच्यासह संचालक मंडळ, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *