Headlines

सांगली जिल्हा बँकेसाठी महायुतीची जुळवाजुळव सुरू:प्रस्थापितांना हरवायचे असेल तर एकत्र लढा, मंत्री चंद्रकांत पाटलांची मित्रपक्षांना साद




सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीत प्रस्थापितांना पराभूत करायचे असेल, तर महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवणे गरजेचे आहे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, जिल्हा बँक निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वासोबत प्राथमिक चर्चा केली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी, अशी भाजपची स्पष्ट इच्छा असून त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) कडून अनेक उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेची ही प्रतिष्ठेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवली जाणार, की सर्व पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार, याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. गोकुळ निवडणुकीचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी दुसरीकडे, कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित करण्यासाठी बोलावण्यात आलेली दुसरी बैठकही निष्फळ ठरली आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बैठकीदरम्यान ठरावधारकांच्या ओळख परेडवरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीतच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, ज्यामुळे बैठकीतील वातावरण तापले होते. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता होत नसल्याने अखेर गोकुळच्या जागावाटपाचा तिढा आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री यावर अंतिम चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. हे ही वृत्त वाचा

निवडणूक आयोग स्वायत्त संस्था, सरकारच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच नाही:कोकणातील पर्यटन अन् रोजगाराचा विचार व्हावा, अणुऊर्जा प्रकल्पाबाबत तटकरेंची स्पष्ट भूमिका

मुख्य निवडणूक आयुक्त आणि भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात आलेल्या बातम्यांवर त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पण देशातील राजकीय विरोधक आपली भूमिका मांडू शकतात, परंतु निवडणूक आयोगाच्या कामात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो, कारण ती एक स्वायत्त संस्था आहे, असे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, विरोधकांना अधिक माहिती मागण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *