“काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासारख्या अत्यंत स्वायत्त व संवैधानिक संस्थेविषयी संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू केला होता. मात्र, तिन्ही निवडणूक आयुक्तांनी संयुक्त स्वाक्षरीने प्रसिद्ध
.
तिन्ही आयुक्तांच्या संयुक्त स्वाक्षरीने विरोधकांचे षडयंत्र निष्फळ
केंद्रीय निवडणूक आयोगात फूट पडल्याचा विरोधकांचा आभास कसा खोटा ठरला, हे स्पष्ट करताना अशोक चव्हाण म्हणाले, “कॅबिनेट सेक्रेटरींकडे गेलेले निवडणूक आयोगाचे अंतर्गत पत्र हे कोणत्याही निवडणूक धोरणात्मक निर्णयाशी संबंधित नव्हते. ते केवळ एका अधिकाऱ्याच्या प्रतिनियुक्तीशी संबंधित प्रशासकीय पत्र होते. मात्र, या साध्या पत्राला वेगळाच राजकीय रंग देऊन आयोगात अंतर्गत मतभेद असल्याचा कांगावा राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्तांसह तिन्ही आयुक्तांनी संयुक्त स्वाक्षरी करून या प्रकरणावर अधिकृत खुलासा केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगात कोणतीही फूट नसून संस्था पूर्णपणे एकसंध असल्याचे सिद्ध झाले आहे.”
फॉर्म क्रमांक 6ला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता; संभ्रम कशासाठी?
मतदार यादी पुनरीक्षणातील फॉर्म क्रमांक 6च्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आरोपांचा समाचार घेत ते म्हणाले, “एसआयआर मोहिमेत नवीन मतदार नोंदणीसाठी वापरला जाणारा फॉर्म क्रमांक 6हा सर्वोच्च न्यायालयाने ज्या मसुद्यात मंजूर केला आहे, तंतोतंत त्याच स्वरूपात वापरला जात आहे. ज्या गोष्टीला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे, त्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे.”
संविधानाचा केवळ दिखावा
“राहुल गांधी ज्या संविधानाचा उदोउदो करतात, त्याच संविधानाने निर्माण केलेली न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग त्यांना मान्य आहेत का? संवैधानिक संस्थांवर चिखलफेक करून संभ्रम निर्माण करण्याचा हा पोरखेळ विरोधकांनी आता थांबवावा.”

जिंकले की आयोग योग्य, हरले की ईव्हीएम खराब; काँग्रेसची दुटप्पी नीती
काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवत अशोक चव्हाण म्हणाले, “कर्नाटक, तेलंगणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात जेव्हा काँग्रेस निवडून आली, तेव्हा याच निवडणूक आयोगाने निष्पक्ष काम केले होते. तिथे जिंकल्यावर आयोग चांगला आणि जिथे भाजप जिंकतो किंवा काँग्रेसचा पराभव होतो, तिथे लगेच मतचोरीचा आणि आयोगाच्या लाचारपणाचा आरोप करायचा, ही काँग्रेसची दुटप्पी नीती जनतेला चांगलीच कळून चुकली आहे.”
ईव्हीएम हॅकिंगचे आव्हान पेलता आले नाही
“यापूर्वी विरोधकांनी ईव्हीएमवरही असेच बिनबुडाचे आरोप केले होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने सर्वांना उघड आव्हान दिले होते की समोर येऊन ईव्हीएम हॅक करून दाखवा. पण एकही राजकीय पक्ष किंवा तज्ज्ञ ते सिद्ध करू शकला नाही. ईव्हीएमचा मुद्दा निष्फळ ठरल्याने आता थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर वैयक्तिक हल्ले चढवले जात आहेत.”
मतचोरीचे रडगाणे बंद करा, आधी आत्मपरीक्षण करा!
पराभवाचे खापर संस्थांवर फोडणाऱ्या विरोधकांना सल्ला देताना ते म्हणाले, “निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतो. जनतेचे प्रश्न घेऊन जमिनीवर काम करणाऱ्यांना जनता कौल देते. मात्र, मेहनत करण्याची तयारी ठेवायची नाही आणि जनतेने नाकारल्यानंतर प्रत्येक पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे, हा देशातील मतदारांचा आणि लोकशाही जनमताचा घोर अवमान आहे.” स्वतःच्या चुका आणि आळस झाकण्यासाठी देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक संस्थांना जगभरात बदनाम करण्याचे षडयंत्र काँग्रेसने त्वरित थांबवावे, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला.
—————
हेही वाचा…
‘कठपुतळी’ बनलेल्या ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री मैदानात : ‘SIR’ची पोलखोल झाली तर सत्ता टिकणार नाही आणि देश विकता येणार नाही!, नाना पटोलेंचा हल्लाबोल

“केंद्रीय निवडणूक आयोग ही आता निष्पक्ष संस्था राहिलेली नसून ती पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची ‘कठपुतळी’ बनून लोकशाहीची पद्धतशीर हत्या करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बेकायदेशीर कारभाराची पोलखोल झाली, तर भविष्यात पुन्हा सत्तेवर येता येणार नाही आणि देश विकता येणार नाही, या भयापोटीच भाजपचे सर्व राज्यांतील मुख्यमंत्री ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी सरसावले आहेत,” असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरील भ्रष्टाचाराचे आरोप, महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाचा अंतर्गत संघर्ष आणि राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. येथे वाचा संपूर्ण बातमी