Headlines

मविआच्या बदनामीसाठी वाझेंना हाताशी धरून 'फेक नॅरेटिव्ह' रचले:नाना पटोलेंचा सरकारवर थेट हल्लाबोल; अँटिलिया प्रकरणातील जिलेटिन नागपूरहूनच आले होते!




“उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा संपूर्ण कट हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच रचला गेला होता. आज सत्तेत बसलेल्या मंडळींनीच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हाताशी धरून महाराष्ट्रात हे ‘फेक नॅरेटिव्ह’ उभे केले होते. त्या गाडीतील जिलेटिनच्या कांड्या नागपूरमधूनच आल्याची माहिती खुद्द सरकारनेच विधानसभेत दिली होती,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी सचिन वाझे, अँटिलिया प्रकरण, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग, निवडणूक आयोगाची मनमानी आणि 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणाऱ्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त महामोर्चाबाबत काँग्रेसची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. अँटिलिया कट- मविआला पाडण्यासाठी रचलेला महाषडयंत्र अँटिलिया प्रकरण आणि सचिन वाझे यांच्या न्यायालयीन घडामोडींवर बोलताना नाना पटोले म्हणाले, “सचिन वाझेला जामीन मिळणे किंवा त्याचे सरकारी साक्षीदार होणे, हे होणारच होते. कारण हा संपूर्ण कट पूर्वनियोजित होता. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या माध्यमातून मविआ सरकार अस्थिर करण्यासाठी अंबानींच्या घराचा सहारा घेण्यात आला.” नागपूरहून आलेल्या जिलेटिनचे गूढ काय? “मी स्वतः विधानसभेत हा प्रश्न वारंवार उपस्थित केला होता. गाडीत ठेवण्यात आलेली जिलेटिन नागपूरमधून आणली गेली होती, अशी अधिकृत माहिती सरकारने सभागृहात दिली होती. मग हे जिलेटिन नागपुरातून कोणी पुरवले? त्यामागे कोणाचा हात होता? गाडी लावणारा माणूस दोनच दिवसांत पाण्यात बुडून आत्महत्या करतो असा बनाव कसा रचला गेला? हे सर्व चित्र महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि सत्ता बळकावण्यासाठी तयार केले गेले होते.” अधिकाऱ्यांना हाताशी धरून बदनामी “आज परमबीर सिंग कुठे आहेत, याचा थांगपत्ता नाही आणि वाझे माफीचा साक्षीदार बनण्याच्या तयारीत आहे. यावरून स्पष्ट होते की, सत्तेत बसलेल्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे मोठे पाप केले होते.” 4 ऑक्टोबरच्या ठाकरे बंधूंच्या महामोर्चात काँग्रेस सहभागी होणार! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत पुकारलेल्या महामोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का, या प्रश्नावर नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली. “देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जे जे लढा उभारतील, त्या सर्वांसोबत काँग्रेस खंबीरपणे उभी राहील. आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला आपल्या खिशात ठेवून जनतेच्या मतांवर थेट दरोडा टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे 4 ऑक्टोबरच्या मोर्चात काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी होईल.” राहुल गांधींच्या पाहणीचा दाखला “आमचे नेते राहुल गांधी यांनी स्वतः दिल्लीतील एका मतदान केंद्राची पाहणी केली. तिथे 600 मतदारांच्या यादीत एकाच व्यक्तीचे नाव पुन्हा पुन्हा नोंदवले गेल्याचे उघड झाले. निवडणूक आयोग इतक्या खालच्या पातळीवर जाऊन काम करत असेल, तर हे लोकशाहीची हत्या करणारे पाप आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची नावे वगळणे आणि बोगस मतदार नोंदणी करणे याविरोधात आता सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरत असून, ४ ऑक्टोबरचा एल्गार ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला. ———————— हेही वाचा…. खासदार संजय राऊतांविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल: न्यायाधीशांना ‘दलाल’ म्हणणे अन् न्यायव्यवस्थेला ‘वाळवी’ची उपमा; खंडपीठाकडून नोटीस जारी न्यायव्यवस्था आणि थेट न्यायालयातील न्यायमूर्तींवर अत्यंत आक्षेपार्ह, अवमानकारक विधाने केल्याच्या गंभीर आरोपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात संजय राऊत यांच्याविरोधात ‘फौजदारी न्यायालयाचा अवमान’ याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची प्राथमिक दखल घेत न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने खासदार संजय राऊत यांच्यासह संबंधित वक्तव्ये प्रसारित करणाऱ्या माध्यम घटकांना अधिकृत नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *