Headlines

शिवाजी पार्क कोणाच्या बापाचं आहे का?:मोर्चाच्या परवानगीवरून मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक, भाजपवरही निशाणा




मनसे नेते संदीप देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) मैदानावर होणाऱ्या आंदोलनाच्या परवानगीवरून भाजप आणि काही स्थानिक रहिवाशांवर जोरदार टीका केली आहे. 4 तारखेला ठाकरे गट आणि मनसेचा संयूक्त मोर्चा होणार असल्याचे सांगताना, 2 तारखेला सीजेपीकडून आंदोलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाची परवानगी मागण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या मागणीला भाजपकडून आक्षेप घेतला जात असल्याचा दावा देशपांडे यांनी केला. ‘भाजपचा आक्षेप कशासाठी?’ आंदोलनाच्या परवानगीवर भाजप आक्षेप घेत असेल, तर त्यांचा त्याच्याशी काय संबंध, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. हा विषय सरकार आणि प्रशासनाशी संबंधित असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला. ‘हे रहिवासी की भाजपचा बुरखा?’ शिवाजी पार्क परिसरातील काही रहिवाशांनी आंदोलनामुळे त्रास होत असल्याचे सांगत विरोध केल्याचा उल्लेख करत देशपांडे यांनी त्यांच्यावरही टीका केली. ‘हे रहिवासी आहेत की भाजपचा बुरखा पांघरलेले लांडगे आहेत?’ असा सवाल त्यांनी केला. हे वक्तव्य करताना देशपांडे यांनी संबंधित रहिवाशांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. ‘शिवाजी पार्क सार्वजनिक वास्तू’ शिवाजी पार्क हे दोन-चार रहिवाशांच्या मालकीचे नसून सार्वजनिक ठिकाण असल्याचे देशपांडे यांनी म्हटले. ‘शिवाजी पार्क काय कोणाच्या बापाचं आहे का?’ असा सवाल करत त्यांनी सार्वजनिक मैदानावर आंदोलन करण्याच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला. ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा साक्षीदार’ शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक महत्त्वाचाही देशपांडे यांनी उल्लेख केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या सभांपर्यंत शिवाजी पार्कने अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन आणि बदलाची भूमिका शिवाजी पार्कने ऐतिहासिकदृष्ट्या बजावल्याचेही ते म्हणाले. निवडणूक आयोगावरही निशाणा निवडणूक आयोगाच्या कारभारावरून जनतेमध्ये संताप असल्याचा दावा देशपांडे यांनी केला. निवडणूक व्यवस्थेबाबत लोकांच्या मनात असलेला रोष देशभर व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले. हा संताप व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने नागरिकांना दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘भाजपची आंदोलनं तेव्हा का चालली?’ यावेळी देशपांडे यांनी भाजपच्या पूर्वीच्या आंदोलनांचा संदर्भ देत सवाल उपस्थित केला. भाजपकडून यापूर्वी आंदोलनं, रस्ता रोको आणि इतर कार्यक्रम झाले, त्यावेळी शिवाजी पार्कमधील रहिवाशांनी अशाच प्रकारे आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘जनता हुकूमशाहीला कंटाळली’ जनतेला सध्याच्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा कंटाळा आला असून जनता रस्त्यावर उतरणार असल्याचा दावा देशपांडे यांनी केला. दोन-चार लोकांनी विरोध केला तरी आंदोलनावर त्याचा परिणाम होणार नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. —————— ही बातमी पण वाचा.. निवडणूक आयोगावर बोलतोय तर भाजपला त्रास का?:’शिवतीर्था’वरून राज ठाकरे – उद्धव ठाकरेंची संयुक्त गर्जना; 4 ऑक्टोबरला विराट मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दशकांनंतर अत्यंत ऐतिहासिक राजकीय चित्र पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी संयुक्त पत्रकार परिषद घेत 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणाऱ्या महामोर्चाची अधिकृत घोषणा केली. “हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा सत्तेच्या स्पर्धेचा नसून, देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, सर्वांच्या हातात फक्त राष्ट्रध्वज तिरंगाच फडकेल,” अशी साद दोन्ही ठाकरे बंधूंनी तमाम जनतेला आणि सर्वपक्षीय नेत्यांना घातली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *