Headlines

हिंगोलीत उपोषणकर्त्यांना मारहाण:चौघांवर शहर पोलिस ठाण्यात अदखालपात्र गुन्हा, जल जीवनच्या कामांच्या चौकशीची मागणी




हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणकर्त्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी चौघांवर बुधवारी ता. 30 रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. या कामांवर तब्बल दिड कोटी रुपयांचा खर्च झाला असला तरी प्रत्यक्षात गावात पाणीच आले नाही. कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही पाणी नसल्याने गावकऱ्यांनी या कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी गावकरी गजानन शिंदे, दत्ता शिंदे, विजय भोरगे, विजय बनसोडे, समाधान बनसोडे, मारोती पवार यांच्यासह गावकऱ्यांनी ता. 28 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत या कामाची चौकशी होत नाही तसेच गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भुमीका उपोषणकर्त्यांनी घेतली. दरम्यान, बुधवारी ता. 30 सायंकाळी गावातील रमेश शिंदे, राजेश शिंदे, सुरेश शिंदे, विलास शिंदे यांनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन गजानन शिंदे यास तु आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवागीळ करून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तेथे असलेल्या काही गावकऱ्यांनी सोडवा सोडव केली. या प्रकरणी गजानन शिंदे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वरील चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, पोटे, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत. पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार- गजानन शिंदे गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. दोन वर्षापासून गावात पाणी नाही. जो पर्यंत पाणी मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *