Headlines

तायक्वांदोमध्ये कौशल्याचा ‘पंच’; 17 सुवर्णांसह 36 पदकांची कमाई:श्रीगोंद्यातील 17 खेळाडूंची विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड‎




श्रीगोंदे शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी तब्बल ३६ पदकांची लयलूट करत श्रीगोंदे येथे आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. खेळाडूंनी १७ सुवर्ण, ७ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, सुवर्णपदक पटकावणाऱ्या अकॅडमीच्या १७ खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदे येथे ही जिल्हास्तरीय स्पर्धा झाली. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधून तब्बल ९६६ खेळाडूंनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला मोठी रंगत आली. चुरशीच्या लढतींमध्ये अकॅडमीच्या खेळाडूंनी अचूक तंत्र, वेग, शारीरिक क्षमता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दमदार कामगिरी केली. नियमित सराव, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर अकॅडमीच्या खेळाडूंनी हे यश मिळवले. आता जिल्हास्तरीय कामगिरीनंतर त्यांची नजर पुणे विभागीय स्पर्धेवर आहे. ४ व ५ ऑक्टोबरदरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी, पुणे येथे ही स्पर्धा होणार आहे. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले सुवर्णपदक विजेते ऋतिका अशोक दातीर, ज्ञानेश्वरी भरत खेडकर, गायत्री सतीश भुजबळ, प्राजक्ता राजू तरटे, शर्वरी सूर्यभान गोलांडे, यश राजेंद्र खाकाळ, विराज विठ्ठल बरबडे, अर्णव गोविंद वाघ, ओंकार बाबासाहेब ननावरे, कृष्णा माणिक खेडकर, अंकित शहाजी खामकर, प्रणव गंगाधर रायकर, नीरज राजेंद्र जैन, ऋतुराज प्रकाश थीटे, वरद किरण काळे, अमरजीत प्रवीण बळे आणि प्रज्वल सुनील ढवळे यांचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *