Headlines

बाजार समितीच्या विकासासाठी13 कोटींचा प्रस्ताव:वार्षिक सभेत सभापती नितीन आहेर यांची माहिती; आवारात शेतमालाची आवक वाढविण्यासाठीचे नियाेजन‎



बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांमध्ये शेतकऱ्यांसाठी मूलभूत व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १३ कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव कृषी पणन मंडळाकडे सादर करण्यात आला आहे. मुख्य बाजार आवारासाठी ८ कोटी आणि उपबाजार आवारासाठी ५ कोटी रुपयांचा निधी प्रस्

.

बाजार समितीची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३०) सभापती नितीन आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संचालक व माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, उपसभापती योगेश ढोमसे, संचालक डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. सयाजीराव गायकवाड, पंढरीनाथ खताळ, कारभारी आहेर, डॉ. राजेंद्र दवंडे, विक्रम मार्कंड, संजय जाधव, सुखदेव जाधव, वाल्मिक वानखेडे, सचिन अग्रवाल, सुशिल पलोड, रवींद्र पवार, डॉ. वैशाली जाधव, मीना शिरसाठ व सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे उपस्थित होते.

शासनाच्या १०० टक्के अनुदान योजनेतून मुख्य बाजार आवाराच्या विकासासाठी ८ कोटी आणि उपबाजार आवारासाठी ५ कोटी रुपये मिळावेत, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या निधीतून शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. चांदवड येथे कांदा लिलावासाठी भव्य सेलहॉलचे बांधकाम पूर्ण झाले असून, वडाळीभोई येथे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरू आहे. वडनेरभैरव उपबाजार आवारात मुख्य प्रवेशद्वार व वॉल कम्पाऊंडचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. रायपूर येथे मूलभूत सुविधा उभारून कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आहेर यांनी सांगितले. सभेच्या सुरुवातीला मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे सभावृत्तांत, आर्थिक पत्रके व सन २०२५-२६ चा वार्षिक अहवाल वाचून दाखवण्यात आला. सभासदांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली. सभेस डॉ. शामराव जाधव, बापू शिरसाठ, ग्रामपंचायत, सोसायटींचे प्रतिनिधी, व्यापारी, माथाडी कामगार प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी माती- पाणी परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांना माफक दरात माती व पाणी परीक्षणाची सुविधा मिळावी, यासाठी बाजार समितीत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती नितीन आहेर यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *