![]()
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील मतदारांच्या नावांमध्ये अथवा मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याने संबंधित मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांच्या अनुषंगाने सोमवारी (दि. २८) इगतपुरी नगरपरिषद कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किशोर चव्हाण यांच्या उपस्थितीत एकूण ९२ मतदारांपैकी ४६ मतदारांची सुनावणी घेण्यात आली. यावेळी संबंधित मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे व माहिती घेऊन त्यांच्या मतदार यादीतील नोंदींबाबत सुनावणी करण्यात आली. या प्रक्रियेस प्रशासकीय अधिकारी तथा बीएलओ पर्यवेक्षक रमेश राठोड यांनी सहाय्य केले. उर्वरित मतदारांची सुनावणी नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून, मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
Source link
इगतपुरीत 46 मतदारांची सुनावणी पूर्ण:मतदार यादीतील नोंदींच्या दुरुस्तीसाठी नगरपरिषद कार्यालयात प्रक्रिया