![]()
जागा आपल्या नावावर करण्याची मागणी करत 77 वर्षीय आजोबांना नातवाने लोखंडी रॉड आणि बांबूने मारहाण केल्याची घटना थेऊर येथे घडली. सुनेनेही मारहाण केल्याचा, तसेच घरातील वस्तूंचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तेजस आशीष भापकर (वय 23, रा. बोरीआयंदी, ता. दौंड) आणि मंगल आशीष भापकर (वय 45, रा. चिंतामणी गणपती मंदिराजवळ, थेऊर, ता. हवेली) यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वामन गेणबा भापकर (वय 77, रा. चिंतामणी गणपती मंदिराजवळ, थेऊर) यांनी फिर्याद दिली. तेजसने संपूर्ण जागा आपल्या नावावर करण्याची मागणी केली. ती मान्य न केल्यास जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर रॉड आणि बांबूने मारहाण केली. त्यांच्या हाताच्या दंडाला चावा घेऊन लाथाबुक्क्यांनीही मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंगल हिनेही शिवीगाळ करून हाताने व बुक्क्यांनी मारहाण केली. घरातील खुर्ची, टेबल, गॅस शेगडीसह अन्य वस्तूंचे नुकसान करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना अटक झालेली नाही. पोलिस हवालदार एन बारगजे तपास करीत आहेत. तरुणाचे अपहरण करून बेल्ट-काठीने मारहाण खराडी गावठाणातून तरुणाला कारमध्ये जबरदस्तीने घालून त्याचे अपहरण करण्यात आले. जिवे मारण्याची धमकी देत बेल्ट आणि काठीने मारहाण करून त्याला जखमी केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शुभम नामदेव खवळे (वय 20), साई नामदेव खवळे (वय 18, दोघे रा. हडपसर), सतरा वर्षांचा विधीसंघर्षित बालक आणि त्यांचे सात मित्र, यांच्यावर खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्लोक प्रमोद मोरे (वय 19, रा. खराडी गावठाण, मूळ रा. राजेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी गावठाणातील बुद्धविहारासमोर ही घटना घडली. आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आले. त्यांनी संगनमत करून मोरे यांना जबरदस्तीने कारमध्ये घातले. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. त्यानंतर शिवीगाळ करून त्यांना ठार मारण्याची भाषा केली. कमरेच्या बेल्टने आणि काठीने मारहाण करून मोरे यांना जखमी करण्यात आले.
Source link
पुण्यात जागा नावावर न केल्यामुळे 77 वर्षांच्या आजोबांवर जीवघेणा हल्ला:नातू अन् सुनेविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल