Headlines

Abhijeet Dipke Warns Nationwide Protest Against Dnyanesh Kumar


“केंद्रीय निवडणूक आयोग ही लोकशाहीची स्वायत्त संस्था न राहता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या हातातील बाहुले बनली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे ‘देशाचे गद्दार’ असून त्यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांचा तत्काळ राजीनामा

.

देशव्यापी आंदोलनाची दिशा- शिवाजी पार्क ते जंतरमंतर

पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय संघटक अजिंक्य शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या मेहेर, राष्ट्रीय सचिव आफरीन आणि मुंबई समन्वयक प्रणय यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला. उद्या 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), गेट क्रमांक 6 येथून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. आंदोलकांनी राष्ट्रध्वज आणि गांधीजींचे टी-शर्ट परिधान करून शांततापूर्ण मार्गाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

6 राज्यांत दौरे, अखेर जंतरमंतरवर धडकणार

मुंबईनंतर गोवा, बंगळुरू (कर्नाटक), कोलकाता (पश्चिम बंगाल), पाटणा (बिहार), उत्तर प्रदेश आणि रांची (झारखंड) या सहा राज्यांत आंदोलनाची धग पोहोचवली जाईल. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस नवी दिल्लीतील जंतरमंतरवर देशभरातील तरुणांसह बेमुदत ठिय्या आंदोलन (Sitting Protest) सुरू करण्यात येईल आणि जोपर्यंत ज्ञानेश कुमार पायउतार होत नाहीत, तोपर्यंत तिथून हटणार नाही, असा निर्धार दिपके यांनी व्यक्त केला.

आंदोलकांच्या 3 प्रमुख मागण्या:

  1. ज्ञानेश कुमारांचा राजीनामा व गुन्हे दाखल करा: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा तत्काळ राजीनामा घेऊन त्यांच्या गैरकारभाराची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्यावर क्रिमिनल चार्जेस लावले जावेत.
  2. ‘एसआयआर’ (SIR) यादी गोठवा; 2025च्या यादीवरच निवडणुका घ्या: मतदार पडताळणीच्या नावाखाली 2024 पासून तब्बल 13 कोटी मतदारांची नावे संशयास्पद पद्धतीने वगळली गेली आहेत. त्यामुळे चालू ‘एसआयआर’ मोहीम तातडीने थांबवून 2025च्या मूळ मतदार यादीनुसारच पुढील निवडणुका घेण्यात याव्यात.
  3. निवडणूक आयुक्त निवडीत सरन्यायाधीशांचा सहभाग अनिवार्य करा: निवडणूक आयुक्तांची निवड केवळ पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या मर्जीने न होता, ती प्रक्रिया पारदर्शक असावी. सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ निकालानुसार निवड समितीत देशाचे सरन्यायाधीश (CJI) आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींचा सहभाग असावा.

लोकांनी सरकार निवडायचे की सरकारने मतदार? ही उघड हुकूमशाही!

निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर ताशेरे ओढताना अभिजीत दिपके म्हणाले, “लोकशाहीत जनतेने आपले सरकार निवडायचे असते; परंतु आज आपल्या देशात सरकार स्वतः ठरवत आहे की मतदार कोण असणार! हा लोकांच्या मताधिकारावर थेट दरोडा आहे. जर या पद्धतीने फेरफार करून निवडणुका घेतल्या गेल्या, तर सत्ताधारी उद्या अमेरिकेची निवडणूकही जिंकू शकतील, इतकी ही व्यवस्था भ्रष्ट करण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जसा जनक्षोभ उसळला होता, तसाच आता ज्ञानेश कुमारांविरोधात संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल.”

शिवाजी पार्कच्या परवानगीवरून सरकारला सवाल; कायदे फक्त सामान्यांसाठीच का?

शिवाजी पार्क हे सायलंट झोन असल्याने आंदोलनाला परवानगी आणि स्थानिक विरोधाबाबत विचारले असता ते म्हणाले, “सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे आम्हाला आंदोलनाची परवानगी नाकारली जात आहे. मात्र, घटनेने आम्हाला शांततेने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. ब्रिटिश काळात महात्मा गांधींना तरी आंदोलनासाठी परवानगी दिली होती का? शिवाजी पार्क सायलंट झोन असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी भाजपच्या राजकीय रॅलींना तिथे कशी परवानगी मिळते? मग नियम आणि कायदे केवळ सामान्य नागरिकांसाठीच आहेत का?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे बंधूंचा पाठिंबा आणि राजकीय सहभाग

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली, “आदित्य ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले आहेत. आमचे आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून ही सर्वसामान्य नागरिकांची चळवळ (Public Movement) आहे. त्यामुळे ज्या राजकीय नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना या लढ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी कोणत्याही पक्षाचे झेंडे किंवा बॅनर न आणता देशाचा एक सजग नागरिक म्हणून रस्त्यावर उतरावे. जर आपला मतदानाचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला गेला, तर कोणत्याच राजकीय पक्षाला किंवा विचारसरणीला काही अर्थ उरणार नाही,” असेही ते म्हणाले.

तसेच, राज्यातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या रोषाचा दाखला देत भीमनवार यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेची मागणीही त्यांनी लावून धरली. शांततापूर्ण मार्गाने लढून हा लढा दिल्लीच्या तख्तापर्यंत नेण्याचा निर्धार कॉकरोच जनता पार्टीने व्यक्त केला आहे.

———————————-

हेही वाचा…

2 ऑक्टोबरच्या ‘जेल भरो’ आंदोलनाला शरद पवारांचा थेट पाठिंबा: अभिजीत दीपके अन् ठाकरे बंधूंच्या मोर्चांना राष्ट्रवादीची साथ, आंदोलनापूर्वी राजकीय वातावरण तापले!

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त कारभाराविरोधात, मतदार याद्यांमधील कथित ‘एसआयआर’ (SIR) घोटाळ्यावरून मुंबईत पुकारण्यात आलेल्या आंदोलनांना आता महाविकास आघाडीतील बड्या राजकीय पक्षांचे मोठे बळ मिळताना दिसत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके यांनी उद्या, 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) रोजी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात पुकारलेल्या राज्यव्यापी ‘जेल भरो’ आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अधिकृत व जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. येथे वाचा संपूर्ण बातमी

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा: नाना पटोले म्हणाले – लोकशाही वाचवण्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात देशभरातील विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चासाठी इतर विरोधी पक्षांनाही सोबत येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या आंदोलनात सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.